-अनिल भोईर
आशियाई गेम्समध्ये भारतीय महिला कबड्डी संघानेे सलग दुसरा विजय मिळवत ‘अ’ गटात अव्वल स्थान कायम राखले आहे.
आशियाई गेम्सच्या दुसऱ्या दिवशी भारतीय महिला कबड्डी संघाचा सामना थायलंड विरुद्ध झाला. मध्यंतरापर्यत ११-०९ अशी फक्त २ गुणांची आघाडी भारताकडे होती. सुरुवातीला भारतीय खेळाडूंनी पकडी करण्याच्या घाईमध्ये चुका झाल्या.
भारताकडून रणदीप कौरने आक्रमक खेळ करत भारताला आघाडी मिळवून दिली. रणदिपने दोन सुपररेड करत भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला. तसेच सोनाली शिंगटे व रितू नेगीने चांगला खेळ दाखवला. भारताने थायलंडचा ३३-२३ असा पराभव करत दुसऱ्या विजयाची नोंद केली.
यासामन्या आधी झालेल्या दोन सामन्यात श्रीलंकाने इंडोनेशियावर ३४-१७ असा विजय मिळवला. तर कोरिया विरुद्ध चाईन्स तैपाई याच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत कोरियाने २०-१६ विजय मिळवला.
इराणने बांगलादेशला ४७-१९ अशी सहज मात दिली, तर श्रीलंकाने आपल्या तिसरी सामन्यात जपानचा २२-१७ असा पराभव करत दुसरा विजय नोंदवला.
भारतीय महिला संघाचा तिसरा सामना २१ ऑगस्टला सकाळी ७:३० वाजता श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धा (२० ऑगस्ट)
महिला कबड्डी दुसऱ्या दिवसाचे सर्व निकाल:
१) इंडोनेशिया १७ विरुद्ध श्रीलंका ३४
२) चाईस तैपाई १६ विरुद्ध कोरिया २०
३) भारत ३३ विरुद्ध थायलंड २३
४) बांगलादेश १९ विरुद्ध इराण ४७
५) जपान १७ विरुद्ध श्रीलंका २२
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–तिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स
–आॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती