---Advertisement---

शेवयपर्यंत चिवट झुंज देऊनही भारतीय महिला हॉकीपटूंचे स्वप्न धुळीस, भर मैदानात कोसळलं रडू

---Advertisement---

भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिक २०२०मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत इतिहास रचला आहे. परंतु चांगली कामगिरी करूनही भारतीय महिला हॉकी संघाचे पहिले ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले आहे. भारतीय संघ उपांत्य फेरीत बाद झाल्यानंतर शुक्रवारी (०६ ऑगस्ट) कांस्य पदकासाठी मैदानात उतरला होता. हा सामना ब्रिटन विरोधात खेळण्यात आला. ब्रिटनने टोकियो ऑलिम्पिकच्या कांस्य पदकाच्या लढतीत भारताला ४-३ ने पराभूत केले आहे. यानंतर भारताच्या महिला हॉकीपटूंना मैदानावर अश्रू अनावर झाले होते.

पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाच्या जवळ आलेल्या भारतीय संघाला ब्रिटनला पराभूत करण्यात यश नाही मिळाले. या सामन्याच्या एक दिवस अगोदरच भारतीय पुरुष संघाने जर्मनीला ५-४ ने पराभूत करून ४१ वर्षांनंतर कांस्यपदक जिंकण्याची किमया साधली होती.

भारतीय महिला हॉकीपटूंनीही कांस्य पदकासाठी ब्रिटेनला चुरशीची लढत दिली. पण अखेर त्यांच्या हाती निराशा आल्याने त्या भावुक झाल्या. गोलरक्षक सविता पुनियासह संघातील इतर महिला हॉकीपटू मैदानावर रडताना दिसल्या. यावेळी संघ प्रशिक्षकांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रतिस्पर्धी संघाच्या हॉकीपटूही त्यांना सांत्वना देताना दिसल्या.

भारत आणि ग्रेट ब्रिटन यांच्यात कांस्य पदकासाठी अटीतटीची लढाई झाली. दोन्ही संघांमधील पहिला क्वार्टर गोल न करता संपला. ग्रेट ब्रिटनला पहिल्या क्वार्टरमध्ये दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, ज्याचे ते गोलमध्ये रूपांतर करू शकले नाहीत. क्वार्टरच्या पहिल्या ६० सेकंदातच म्हणजेच १६ व्या मिनिटाला ग्रेट ब्रिटनने पहिला गोल करत १-० ने आघाडी घेतली. एलिना शियन रेयरचा शॉट रोखण्याच्या प्रयत्नात भारतीय डिफेंडर दीप ग्रेस एक्काच्या स्टिकने गोल झाला. सामन्याच्या २४ व्या मिनिटाला सारा रॉबर्टसनने गोल केला आणि आपल्या संघाला २-० ने आघाडी मिळवून दिली.

पुढे भारतीय महिला संघाने दुसऱ्या क्वार्टरच्या पहिल्या ५ मिनिटांत ३ गोल केले. गुरजीत कौरने २५ व्या आणि २६ व्या मिनिटाला तर वंदना कटारियाने २९ व्या मिनिटाला गोल केले आणि ३-२ ने आघाडी घेतली. सामन्याच्या तिसऱ्या क्वार्टरच्या पहिल्या ५ मिनिटामध्येच म्हणजेच सामन्याच्या ३५ व्या मिनिटाला ग्रेट ब्रिटनने गोल केला. ब्रिटनची कर्णधार हॉली पिअर्न वेबने या ऑलिंपिकमधील आपला पहिला गोल करत सामन्यात ३-३ ने बरोबरी साधली.

ब्रिटनने पुन्हा एकदा आघाडी घेतली. तिसऱ्या क्वार्टरनंतर चौथ्या क्वार्टरमध्येही त्यांनी भारतावर वर्चस्व राखले. ब्रिटनने ४८ व्या मिनिटाला गोल केला आणि ४-३ ने आघाडी घेत सामना जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या-

अनुभवी गोलंदाज ईशांतला नॉटिंघम कसोटीत का मिळाली नाही जागा? गंभीर कारण आले पुढे

चांगल्या सुरुवातीनंतरही रोहित अवघ्या ३६ धावांवर झेलबाद, मैदान सोडताना स्वत:वरच काढला राग

किती उत्साह म्हणायचा! पंत मैदानात उतरताच दिग्गज क्रिकेटर जोमात; म्हणाले, ‘आता फक्त हल्लाबोल’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---