भारतीय महिला क्रिकेट संघाची फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जने आपल्या इंस्टाग्रामवर गान गातानाचा व्हिडिओ शेअर केला होता. यातून तिच्या चाहत्यींनी या व्हिडीयो वर कमेंट करुन आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. जेमिमाचा हा पहिलाच व्हिडीयो नाही, तिने या आधीही असे अनेक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामव शेअर केले आहेत. क्रिकेट सोबतच हे टॅलेंटही जेमिमा सतत दाखवत असते.
जेमिमा रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) हिने 24 जुलैला आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडियो शेअर केला. 1990 साली जुर्म हा चिन्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात साधना सरगम (sadhana Sargam) आणि कुमार सानू (Kumar Sanu) यांच्या आवाजातील “जब कोइ बाात बिघड जाये” हे गान जेमिमाने गायले आहे. हे जुने गाने तिच्या आवाजात लोकांना चांगलेच मनमोहक ठरले आहे. चाहत्यांकडून या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.
https://www.instagram.com/reel/CvFIyAfLvMQ/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
हा व्हिडियो व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांसोबत भारतीय महिला क्रिकेट संघाचे खेळाडू देखील आपल्या कमेंट्स द्वारे प्रतिक्रिया देत आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू हारलीन देओलनेही कमेंट केली. तीने “ओये होये धाकड लडकी, अच्छी आवाज.” अशी कमेंट केली आहे. जेमिमा गान्याबरोबरच गिटार देखील वाजवते. तिला गान आणि संगीताचीही समज आहे. जेमिमा भारतीय महिला क्रिकेट संघाची एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. दिग्गज खेळाडूंमध्ये तिचे नाव घेतले जाते. तिची फलंदाजीची शैली आणि आक्रमक अंदाजामुळे ती ओळखली जाते.
जेमिमा टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघासाठी सर्वाधिक धावांच्या यादित चौथ्या क्रमावर आहे. तिने भारतीय महिला संघासाठी टी-20 क्रिकेट खेळात 83 सामन्यामध्ये 10 अर्धशतकांसह 1751 धावा केल्या आहेत. एकदिवसाय क्रिकेटमध्ये तिने 24 सामन्यात 523 धावा करुन 4 अर्धशतके ठोकली आहेत.
महत्वाच्या बातम्या:
अमेरिकेतही क्लासेनने दाखवला क्लास! ठोकले MLC मधील पहिले शतक, एमआय पराभूत
युवराजच्या आईकडे 40 लाखांच्या खंडणीची मागणी! युवतीला पोलिसांकडून अटक, वाचा सविस्तर