भारतीय महिला संघ २०२२ मध्ये होणाऱ्या आयसीसी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडसोबत पाच एकदिवसीय आणि एक टी२० सामना खेळणार आहे. मालिकेची सुरुवात ९ फेब्रुवारीमध्ये एका टी२० सामन्याने होईल आणि २४ फेब्रुवारीला या मालिकेचा शेवट होईल. महिला एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन पुढच्या वर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यात न्यूझीलंडमध्येच केले जाणार आहे. यापूर्वी हा विश्वचषक कोरोनाच्या कारणास्तव एक वर्षासाठी स्थगित करण्यात आला होता.
विश्वचषक यापूर्वी ६ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२१ या दरम्यान खेळला जाणार होता. महिला एकदिवसीय विश्वचषकासोबतच महिला टी-२० विश्वचषकही एका वर्षासाठी स्थगित केला गेला आहे. आगोदर टी-२० विश्वचषक २०२२ च्या नोव्हेंबरमध्ये दक्षिण अफ्रिकेत खेळला जाणार होता, पण आता फेब्रुवारी २०२३ मध्ये याचे आयोजन केले जाणार आहे.
न्यूझीलंड क्रिकेटने शुक्रवारी(१२ नोव्हेंबर) भारतासोबत खेळल्या जाणाऱ्या या मालिकेची घोषणा केली आहे की, “न्यूझीलंड महिला संघ आगामी विश्वचषकाच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यासाठी भारतासोबत सहा सामन्यांची मालिका खेळेल, ज्यामध्ये एक टी२० सामना आणि पाच एकदिवसीय सामन्यांचा समावेश असेल.”
न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी डेविड वाइट यांनीही मालिकेविषयी मत मांडले आहे. डेविड म्हणाले की, “भारतीय संघासोबतची मालिका न्यूझीलंड महिला संघाच्या विश्वचषकाच्या तयारीचा महत्वाचा भाग आहे.”
भारतीय महिला संघाचा असा आहे न्यूझीलंड दौरा
९ फेब्रुवारी – एकमेव टी२० सामना – नेपियर
११ फेब्रुवारी – पहिला एकदिवसीय सामना – नेपियर
१४ फेब्रुवारी – दुसरा एकदिवसीय सामना – नेल्सन
१६ फेब्रुवारी – तिसरा एकदिवसीय सामना – नेल्सन
२२ फेब्रुवारी – चौथा एकदिवसीय सामना – क्वीन्सटाउन
२४ फेब्रुवारी – पाचवा एकदिवसीय सामना – क्वीन्सटाउन
दरम्यान, पुढच्या वर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या महिला विश्वचषकात एकूण ३१ सामने खेळले जाणार आहेत. पहिला सामना ४ मार्च २०२२ ला वेंलिंगटनच्या बेसिन रिजर्वमध्ये खेळला जाईल. तसेच विश्वचषकातील शेवटचा सामना ३ एप्रिल २०२२ ला न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्चच्या हेगली ओवल स्टेडिमवर खेळला जाईल.
भारतीय संघाला विश्वचषकातील त्याचा पहिला सामना ६ मार्चला क्वॉलिफायर संघासोबत खेळायचा आहे. भारतीय संघ विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजमध्ये एकूण सात सामने खेळेल. यातील चार सामने मोठ्या संघांसोबत असतील. या चार संघात न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड यांचा समावेश आहे. राहिलेले तीन सामने विश्वचषकाच्या क्वालिफायर संघांसोबत खेळले जातील. विश्वचषकात एकूण आठ संघ सहभाग घेतील.
महत्त्वाच्या बातम्या –
मॅक्सवेल ज्या पाकिस्तानी गोलंदाजाचा चाहता, त्याच्यासोबत सेमीफायननंतर बदलली जर्सी, पाहा फोटो
भारतीय महिला कुस्तीपटूच्या मृत्यूची पसरली होती अफवा, दुसऱ्या दिवशी तिनेच जिंकले सुवर्ण पदक