– अनिल भोईर
आशियाई स्पर्धेत भारतीय महिला संघाने ‘अ’ गटात सलग चार सामने जिंकत आपल्या गटात अव्वाल स्थान पटाकवले आहे. सलग तिसरा सुवर्णपदक मिळवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
भारताचा शेवटचा साखळी सामना यजमान इंडोनेशिया विरुद्ध झाला. भारताने पुन्हा एकदा आक्रमक खेळ करत सामन्यावर पकड मिळवली. भारताची अष्टपैलू खेळाडू साक्षी कुमारीने मध्यंतरापर्यत आक्रमक खेळ करत भारताला आघाडी मिळवून दिली.
साक्षीने आक्रमक चढाई करत गुण मिळवले, तसेच लेफ्ट कॉर्नरला जबरदस्त पकडी केल्या. मध्यंतरापर्यत भारताने २८-१० अशी भक्कम आघाडी मिळवली होती. पायल चौधरी, रणदीप कौर, सोनाली शिंगटे यांनी चांगला खेळ केला.
मध्यंतरानंतर भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक श्रीनिवास रेड्डी यांनी खेळाडू बदली करून बाकी खेळाडूंना खेळण्याची संधी दिली. सायली करिपाळे व प्रियांका यांनी पुन्हा चांगला खेळ करत भारताला ५४-२२ असा चौथा विजयी मिळवून दिला.
‘ब’ गटात चाईस ताईपाईने इराणच्या महिला संघाचा २२-१८ असा पराभव करत गटात खळबळजनक स्थिती निर्माण केली. ‘ब’ सर्व साखळी सामने झाले असून इराण, कोरिया, ताईपाई तिन्ही संघांनी प्रत्येकी २-२ विजय मिळवले आहेत.
आशियाई क्रीडा स्पर्धा (२१ ऑगस्ट)
महिला कबड्डी स्पर्धेचे सर्व निकाल:
१) भारत ३८ विरुद्ध श्रीलंका १२
२) चाईस ताईपाई २२ विरुद्ध इराण १८
३) जपान १२ विरुद्ध थायलंड ४३
४) बांगलादेश २५ विरुद्ध कोरिया ५२
५) भारत ५४ विरुद्ध इंडोनेशिया २३
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–….आणि क्रिकेटमध्ये घडला ‘बाप’ योगायोग
–विराट कोहलीने माजी कर्णधार अझरचा २७ वर्ष जुना विक्रम मोडला
–या कारणामुळे रहाणे तिसऱ्या कसोटीत चमकला
–मुंबईकडून ९९ प्रथम श्रेणी सामने खेळणारा नायर आता पाँडिचेरीकडून खेळणार रणजी सामने