सध्या आयसीसी महिला टी20 विश्वचषक (ICC T20 World Cup) खेळला जात आहे. त्यातील 12वा सामना भारत विरूद्ध बांगलादेश संघात खेळला गेला. या सामन्यात भारताने श्रीलंकेचा धुव्वा उडवला. हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखालील भारतीय संघाने 82 धावांच्या मोठ्या फरकाने शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने सेमीफायनलसाठीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने मर्यादित 20 षटकात 3 बाद 172 धावा केल्या होत्या. श्रीलंकेसमोर 173 धावांचे आव्हान होते, पण चमारी अटापट्टूच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ 19.5 षटकात अवघ्या 90 धावांवरच गारद झाला.
श्रीलंकेसाठी कविष्का दिलहरीने सर्वाधिक 21 धावा केल्या. तर अनुष्का संजीवनीने 22 चेंडूत 20 धावांची खेळी खेळली. अमा कांचनाने 22 चेंडूत 19 धावा केल्या. पण याशिवाय इतर 8 फलंदाज दुहेरी आकडा देखील पार करू शकले नाहीत. श्रीलंका कर्णधार चमारी अटापट्टू 1 धाव करून तंबूत परतली. भारतासाठी अरूंधती रेड्डी आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. रेणुका सिंह ठाकूरने 2 विकेट्स घेतल्या. याशिवाय श्रेयंका पाटील आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. दरम्यान त्यांनी 172 धावा ठोकल्या होत्या. भारतासाठी कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) तुफानी खेळी खेळली. तिने 27 चेंडूत 52 धावा ठोकल्या. दरम्यान तिने 8 चौकारांसह 1 षटकार लगावला. तर सलामीवीर स्म्रीती मानधनाने (Smriti Mandhana) 38 चेंडूत सर्वाधिक 50 धावा केल्या, तर शफाली वर्माने (Shafali Verma) 43 धावांची खेळी केली. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs BAN; दुसऱ्याही सामन्यात भारताचा शानदार विजय
IND vs BAN; बांगलादेशविरूद्ध भारताने रचला इतिहास, षटकारांचा पाडला पाऊस!
IND vs BAN; भारताला मिळाला नवा खतरनाक फलंदाज! ठोकले तुफानी अर्धशतक