भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज व्हीआर वनिता (VR Vanitha) हिने सोमवारी (२१ फेब्रुवारी) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती (VR Vanitha Announced Retirement) जाहीर केली आहे. वयाच्या ३१ व्या वर्षी तिने क्रिकेटला अलविदा केला आहे. ट्वीटरच्या माध्यमांतून तिने ही घोषणा केली असून आपल्या संघ सहकारी कर्णधार मिताली राज आणि गोलंदाज झूलन गोस्वामी यांचे आभारही व्यक्त केले आहेत.
तसेच तिने आतापर्यंतच्या क्रिकेट प्रवासात तिला सहकार्य करणाऱ्या कुटुंबातील सदस्य, मित्र-मंडळी, संरक्षक आणि संघातील इतर साथीदारांचेही आभार मानले आहेत. तसेच तिने देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्त्व करणाऱ्या २ राज्य संघ, कर्नाटक आणि बंगाललाही धन्यवाद म्हटले आहे.
तिने आपल्या ट्वीटर पोस्टमध्ये लिहिले आहे की, “१९ वर्षांपूर्वी जेव्हा मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती, तेव्हा मी फक्त एक छोटीशी मुलगी होते, जिला क्रिकेटप्रती प्रेम होते. आजही क्रिकेटसाठी माझे प्रेम तितकेच आहे. माझे हृदय मला म्हणते की, खेळणे चालू ठेव. पण माझे शरीर मला थांबण्यास सांगत आहे. यावेळी मी माझ्या शरीराचे म्हणणे ऐकले आहे.”
https://twitter.com/ImVanithaVR/status/1495725838750334984?s=20&t=gySnRoENyWVZmRxtjMnPdg
“मी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा करत आहे. हा संघर्ष, आनंद, हृदय तुटणे, शिखणे आणि वैयक्तिक यश साध्य करण्याचा प्रवास राहिला आहे. पण मला काही गोष्टींचा मात्र खेद आहे. मला मिळालेल्या संधींचे, विशेषत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मिळाल्यामुळे मी सर्वांची आभारी आहे. हा माझ्यासाठी शेवट नसून नव्या आव्हानांची नवी सुरुवात आहे,” असे तिने पुढे लिहिले आहे.
व्हीआर वनिताची क्रिकेट कारकिर्द
जानेवारी २०१४ मध्ये वनिताने श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून ती भारतीय संघात सलामीवीर फलंदाजाची भूमिका निभावत आली आहे. तिने आतापर्यंत भारताकडून ६ वनडे सामने खेळले आहे. यादरम्यान तिने ८५ धावा केल्या आहेत. संपूर्ण वनडे कारकिर्दीत तिला एकही अर्धशतक करता आले नाही. टी२० क्रिकेटमध्येही तिला फारशी प्रभावी कामगिरी करता आली नाही. तिने टी२० क्रिकेटमध्ये १६ सामने खेळताना २१६ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
Photo: मैदानात शत्रू, मैदानाबाहेर मित्र!! सूर्यकुमार आणि पोलार्डमधली बॉन्डिंग जिंकले तुमचेही मन
ओदिशाला नमवून माजी विजेत्या बंगलोरने उपांत्य फेरीतील आव्हान अजूनही राखले कायम!
गुजरात जायंट्सवर भारी पडले बंगळुरू बुल्स, मोठा विजय मिळवत दिमाखात सेमी फायनलमध्ये प्रवेश