भारतीय महिला संघ आणि न्यूझीलंड महिला संघात 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. तत्पूर्वी भारतीय नियामक मंडळाने (BCCI) भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही मालिका (24 ऑक्टोबर) पासून सुरू होत आहे. सध्या भारतीय महिला संघ आणि न्यूझीलंड महिला संघ टी20 विश्वचषक (India vs New Zealand) खेळत आहेत.
आयसीसी महिला टी20 विश्वचषकानंतर (ICC Women’s T20 World) भारत-न्यूझीलंड संघात एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. याआधी टी20 विश्वचषकात हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखालील भारतीय संघाचा न्यूझीलंडकडून 58 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव झाला होता. आता दोन्ही संघ भारतीय मैदानावर एकदिवसीय मालिकेत आमने-सामने असणार आहेत.
भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिका (24 ऑक्टोबर) पासून सुरू होणार आहे. यानंतर दुसरा एकदिवसीय सामना (27 ऑक्टोबर) रोजी खेळला जाणार आहे. तर या मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना (29 ऑक्टोबर) रोजी खेळला जाणार आहे. भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) मालिकेतील तिन्ही एकदिवसीय सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळले जाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs NZ; कसोटी मालिकेपूर्वीच गंभीर बनला कोहलीची ढाल! म्हणाला…
भारत-पाकिस्तान येणार आमनेसामने, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूकडे नेतृत्व; या दिवशी होणार रोमांचक लढत
भारत, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू बाबर आझमच्या समर्थनार्थ, जाणून घ्या कोण काय म्हणालं?