भारताचे स्टार कुस्तीपटू बजरंग पुनीया आणि संगीता फोगट येत्या २५ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे. मात्र त्यांचा विवाह सोहळा अत्यंत साधेपणाने होणार आहे. कारण सध्या भारतात कोरोना व्हायरसचे संकट घोंगावत आहे.
त्यांच्या विवाह सोहळ्यात केवळ काही जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार सहभागी होणार आहे. खरंतर बजरंगच्या कुटुंबियांना हा सोहळा मोठा धुमधडाक्यात करायचा होता, मात्र कोरोना व्हायरसच्या संकटाने त्यांना हा सोहळा साधेपणानेच करावा लागणार आहे.
बजरंग आणि संगीता यांचे लग्न मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये पक्के झाले होते. तसेच त्यांनी टोकियो ऑलिंपिक २०२०नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोरोना व्हायरसच्या कारणाने टोकियो ऑलिंपिक १ वर्षाने पुढे ढकलण्यात आले. त्यामुळे त्या दोघांनी यावर्षी २५ नोव्हेंबरला लग्न करण्याचे निश्चित केले.
बजरंग टोकियो ऑलिंपिकसाठी आधीच पात्र ठरला आहे. तसेच सध्या तो स्पोर्ट्स अथॉरेटी ऑफ इंडिया (साई) सेंटरमध्ये राष्ट्रीय शिबिरात सहभागी झालेला आहे. तो लग्नासाठी १ आठवड्याची सुट्टी घेईल. तसेच द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार लग्नानंतर तो काही दिवसात ट्रेनिंगसाठी युएसएला जाण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विश्व कुस्ती चॅम्पियनशीप २०२० ऐवजी होणार ‘ही’ स्पर्धा, UWW चा मोठा निर्णय
साक्षी मलिकने रिओ ऑलिंपिकमध्ये पदक मिळवण्यासाठी ‘अशी’ घेतली होती मेहनत
सात महिन्यांनंतर भारतीय महिला कुस्तीपटूंच्या सरावाला सुरवात