भारत आणि ऑस्ट्रेलिय यांच्यातील दुसरा टी-20 सामना तिरूवानंतपूरममध्ये केळला गेला. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 335 धावांची खेळी केली. भारताच्या तीन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली, तर ऑस्ट्रेलियासाठी नॅथन एलिस याने अप्रतिम गोलंदाजी केली.
नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाले. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतासाठी दोन्ही सलामीवीर फलंदाज अर्धशतकी खेळी करू शकले. तसेच तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या ईशान किशन यानेही वादळी अर्धशतक ठोकले. शेवटच्या षटकांमध्ये रिंकू सिंग याने केलेली धुवाधार खेळी भारतीय संघाला 4 विकेट्सच्या नुकसानावर 235 धावांपर्यंत घेऊन गेली. रिंकू सिंग याने या सामन्यात शेवटच्या षटकांमध्ये महत्वाच्या धावा केल्या. 9 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने त्याने 31 धावांचे योगदान संघासाठी दिले. तसेच तिलक वर्मा याने 2 चेंडूत 7 धावा कुटल्या.
सलामीवीर जशस्वी जयस्वाल याने अवघ्या 25 चेंडूत 53 धावांची खेळी केली. डावातील सहाव्या षटकात नॅथन एलिस याने ऍडम झॅम्पा याच्या हातात त्याला झेलबाद केले. भारतासाठी हा सामन्यातील पहिला झटका होता. ईशान किशन याच्या रुपात संघाने दुसरी विकेट गमावली. जयस्वालच्या विकेटनंतर पुढच्या 10 षटकांमध्ये एकही विकेट ऑस्ट्रेलियाला मिळाली नाही. डावातील 16व्या षटकात ईशानने 52 धावांची खेली केल्यानंतर नॅथन एलिस याच्या हातात झेल दिला. यावेळी मार्कस स्टॉयनिस गोलंदाजी करत होता. कर्णधार सूर्यकुमार यादव यानेही 10 चेंडूत महत्वाच्या 19 धावा केल्या. 18व्या षटकात नॅथन एलिसने त्याला स्टॉयनिसच्या हातात झेलबाद केले. सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानेही शेवटच्या षटकात वैयक्तिक 58 धावा करून विकेट गमावली.
(Indian youngster putting a mad batting effort at Kerala – 235 for 4 from 20 overs.)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलिया – स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस, मार्कस स्टॉयनिस, टिम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक आणि कर्णधार), शॉन ऍबॉट, नॅथन एलिस, ऍडम झाम्पा, तन्वीर संघा.
महत्वाच्या बातम्या –
IPL 2024 Retention: मुंबई इंडियन्सचे रिटेन खेळाडू जाहीर, मोठ्या नावांना दिला नारळ, वाचा यादी
हार्दिक गुजरातचाच! पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार, गुजरात टायटन्सकडून हे खेळाडू करारमुक्त