आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरूवात होऊन आता २ आठवडे झाले आहेत. या हंगामात आतापर्यंत १४ सामने खेळण्यात आले आहेत. या २ आठवड्यात आयपीएल फ्रँचायझी संघांतील युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. आपल्या धडाकेबाज फलंदाजीने त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यातील १४ वा सामना शुक्रवारी (२ ऑक्टोबर) दुबई येथे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. या सामन्यात हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. या सामन्यातही युवा फलंदाजाची धडाकेबाज खेळी पाहायला मिळाली.
या खेळाडूंनी केली चमकदार कामगिरी
हैदराबादकडून फलंदाजी करताना युवा फलंदाज प्रियम गर्गने २६ चेंडूत ५१ धावांची तडाखेबंद खेळी केली. यामध्ये १ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश होता. ही खेळी करत त्याने आयपीएलमधील पहिले वहिले अर्धशतक झळकावले.
गर्गपूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा युवा खेळाडू शुबमन गिलनेही २ सामने खेळत चमकदार कामगिरी केली आहे. त्याने स्पर्धेच्या आठव्या सामन्यात हैदराबादविरुद्ध खेळताना नाबाद ७० धावांची खेळी केली होती. सोबतच पुढे बाराव्या सामन्यात राजस्थानविरुद्ध खेळताना ४७ धावांची खेळी केली होती.
त्यानंतर या यादीत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळणारा देवदत्त पडिक्कल या युवा फलंदाजाचाही समावेश आहे. पडिक्कलने आयपीएलच्या तिसऱ्याच सामन्यात हैदराबादविरुद्ध खेळताना ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. हे त्याचे पदार्पणातील पहिलेच अर्धशतक होते. त्यानंतर त्याने दहाव्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली होती.
त्याच्याव्यतिरिक्त मुंबई इंडियन्स संघाचा युवा फलंदाज इशान किशनने आयपीएलच्या दहाव्या सामन्यात बेंगलोरविरुद्ध खेळताना खतरनाक फलंदाजी करत ९९ धावांची धुव्वांदार खेळी केली. यावेळी त्या आपले शतक पूर्ण करता आले नाही. परंतु संघाच्या धावसंख्येत त्याने मोलाचे योगदान दिले होते.
आयपीएल २०२० मध्ये पहिल्या दोन आठवड्यांमध्ये चमकदार कामगिरी करणारे युवा फलंदाज
७०* आणि ४७ धावा- शुबमन गिल
५६ आणि ५४ धावा- देवदत्त पडिक्कल
५१ धावा- प्रियम गर्ग
९९ धावा- इशान किशन