सध्या संपूर्ण देशात शेतकरी आंदोलनामुळे हवा तापलेली आहे. कृषी कायद्यांविरोधात शेतकरी सध्या दिल्लीच्या सीमेवर गेले ७२ दिवस झाले आंदोलन करत आहेत. येत्या ६ फेब्रुवारीला चक्क जाम करण्याचाही शेतकऱ्यांचा इरादा आहे. या मुद्द्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील दाखल घेतली जात आहे.
अमेरिकन पॉपस्टार रेहानाने याबाबत ट्विट करत आवाज उठवण्याचे आवाहन केले. मात्र याला विरोध करत बाह्यशक्तींनी भारताच्या अंतर्गत मामल्यात दाखल घेऊ नये, असा मतप्रवाह सुरु झाला. अनेक प्रसिद्ध सेलिब्रेटींनी भारत एकजूट आहे, अशा अर्थाचे ट्विट केले. यात भारतरत्न सचिन तेंडुलकरचा देखील समावेश होता.
मात्र तेंडुलकरच्या या ट्विटनंतर त्याला मोठ्या प्रमाणात चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते आहे. ट्विटरवर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. मात्र आता याही पुढचे पाऊल उचलले गेले असून केरळमध्ये सचिन तेंडुलकरच्या पुतळ्यावर काळी शाई फेकण्यात आली. इंडियन युथ काँग्रेसच्या सभासदांनी हे कृत्य केल्याची माहिती आहे.
सचिनने केलेल्या ट्विटमुळे अनेकजण नाराज
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून अमेरिकन पॉपस्टार रिहाना हिने मंगळवारी (२ फेब्रुवारी) ट्विट केले. त्यामुळे या आंदोलनाची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर होऊ लागली आहे. त्याचवेळी सचिन तेंडुलकरने रिहानाच्या ट्विटला अप्रत्यक्षरीत्या प्रत्युत्तर देत, ट्विट केले की, ‘भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. बाहेरचे लोक हे पाहू शकतात परंतु सहभागी होऊ शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे आणि त्यांनी भारतासाठी निर्णय घ्यावा. चला एक राष्ट्र म्हणून एकजूट राहूया.’
India’s sovereignty cannot be compromised. External forces can be spectators but not participants.
Indians know India and should decide for India. Let's remain united as a nation.#IndiaTogether #IndiaAgainstPropaganda— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 3, 2021