कटक। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात रविवारी(22 डिसेंबर) तिसरा आणि निर्णायक वनडे सामना बाराबती स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने 4 विकेट्सने विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने ही वनडे मालिकाही 2-1 अशा फरकाने जिंकली. भारत आणि वेस्ट इंडिज संघाचा हा यावर्षातील शेवटचा सामना होता.
या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 10 षटके गोलंदाजी करताना 66 धावा देत 1 विकेट घेतली. शमीने 2019 या वर्षात 21 वनडे सामन्यात 22.64 च्या सरासरीने 42 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे तो यावर्षीचा वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.
विशेष म्हणजे याआधी 2014मध्येही शमी वनडेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता. त्याने 2014मध्ये वनडेत 38 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे एका वर्षाअखेरीस वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम दोन वेळा करणारा शमी पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
याआधी कपिल देव, इरफान पठाण आणि अजित अगरकर यांनी प्रत्येकी 1 वेळा असा कारनामा केला आहे.
कपिल हे 1986मध्ये वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज होते. त्यांनी त्यावर्षात वनडेत 32 विकेट्स घेतल्या होत्या. तर अगरकर 1998मध्ये वनडेत 58 विकेट्स घेत अव्वल स्थानी राहिला होता. त्याचबरोबर 2004मध्ये इरफानने वनडेत 47 विकेट्स घेतल्या होत्या. त्यावर्षात तो वनडेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता.
वनडेत एका वर्षात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज (भारतीय) –
1986 – कपिल देव (32 विकेट्स)
1998 – अजित अगरकर (58 विकेट्स)
2004 – इरफान पठाण (47 विकेट्स)
2014 – मोहम्मद शमी (38 विकेट्स)
2019 – मोहम्मद शमी (42 विकेट्स)
भारतीय गोलंदाजांची कमाल…
#म #मराठी #ODI #INDvsWI @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT pic.twitter.com/3qxdtW6NXa— Maha Sports (@Maha_Sports) December 23, 2019
'कॅप्टन' कोहलीने शार्दुल ठाकूरचे केले चक्क मराठीत कौतुक; चाहत्यांनी दिली अशी प्रतिक्रिया
वाचा👉https://t.co/40kvn8JjWl👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #INDvWI #ViratKohli #ShardulThakur— Maha Sports (@Maha_Sports) December 23, 2019
बापरे! आयपीएलच्या एका संघात प्रशिक्षकापेक्षा खेळाडूचं आहे १० वर्षांनी मोठा
वाचा- 👉 https://t.co/UUWGzJeBRU👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #IPL2020— Maha Sports (@Maha_Sports) December 23, 2019