---Advertisement---

इशान किशनने अर्धशतकासह पदार्पण गाजवले! ‘असा’ कारनामा करणारा रहाणेनंतरचा ठरला दुसराच भारतीय

On: रविवार, मार्च 14, 2021 10:45 PM
---Advertisement---

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा टी२० सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात इंग्लंडने १६५ धावांचे आव्हान भारतीय संघासमोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून २२ वर्षीय इशान किशनने अर्धशतकी खेळी केली. विशेष म्हणजे त्याने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्यामुळे त्याच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे.

इशान किशनने या सामन्यात ३२ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ४ षटकार मारले. त्यामुळे तो टी२० क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी असा कारनामा केवळ अजिंक्य रहाणेने केला होता. रहाणेने देखील त्याच्या पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती.

विशेष म्हणजे रहाणेने देखील इंग्लंडविरुद्धच ही कामगिरी केली होती. त्याने २०११ साली मँचेस्टर येथे इंग्लंडविरुद्ध टी२० पदार्पण करताना ६१ धावांची खेळी केली होती.

विराटसह अर्धशतकी भागीदारी

भारताने दुसऱ्या टी२० सामन्यात सलामीवीर केएल राहुलची विकेट पहिल्याच षटकात गमावली होती. मात्र त्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि इशानने डाव सांभाळताना अर्धशतकी भागीदारी रचली. या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी रचली. ही भागीदारी इशान आदिल राशिदच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने तुटली.

पण पुढे विराटने आक्रमक खेळ कायम ठेवत अर्धशतक पूर्ण केले. याबरोबरच भारताला षटकात १६५ धावांचा आव्हान पूर्ण करुन देत भारताला विजय मिळवून दिला. विराटने नाबाद ७३ धावा केल्या.

इंग्लंडच्या १६४ धावा

या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली. इंग्लंडकडून जेसन रॉयने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली. तसेच कर्णधार ओएन मॉर्गनने २८ धावांची खेळी केली. तर डेव्हिड मलान(२४), बेन स्टोक्स(२४) आणि जॉनी बेअरस्टो (२०) यांनी छोटेखानी खेळी करत योगदान दिले. त्यामुळे इंग्लंडने २० षटकात ६ बाद १६४ धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

INDvsENG 2nd T-20: इशान किशन, विराट कोहलीची शानदार अर्धशतके; भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय

इशान किशन, सुर्यकुमारच्या पदार्पणामुळे झाला खास विक्रम; ‘अशी’ कामगिरी करणारी पहिलीच भारतीय जोडी

रिषभ पंत रिव्ह्यू सिस्टीम ऍक्टिवेट! अचूक निर्णय घेत डेविड मलानचा अडथळा केला दूर, बघा व्हिडिओ    

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---