पुणे,दि.7 डिसेंबर 2023: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत मुलांच्या गटात अर्णव पापरकर, क्रिश त्यागी यांनी तर मुलींच्या गटात अमोदिनी नाईक, लक्ष्मीसिरी दांडू, माया राजेश्वरन रेवती यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट,येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात भारताच्या अर्णव पापरकर याने जपानच्या चौथ्या मानांकित काझुमा किमुराचा 6-1 6-1 असा सहज पराभव करून आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम राखली. फ्रान्सच्या पंधराव्या मानांकित मोइस कौमे याने भारताच्या अकराव्या मानांकित अर्जुन पंडितचे आव्हान 6-4 6-4 असे संपुष्टात आणले. काल अव्वल मानांकित खेळाडूला पराभवाचा धक्का देणाऱ्या जपानच्या सोळाव्या मानांकित हिरोमासा कोयामा याने भारताच्या कंदवेल महालिंगम अकिलांडेश्वरीला 6-1 7-5 असे पराभूत केले. दुसऱ्या मानांकित भारताच्या क्रिश त्यागीने भूषण होबामचा 6-2 2-6 6-2 असा पराभव करून आगेकूच केली.
मुलींच्या गटात भारताच्या अमोदिनी नाईकने इराणच्या दुसऱ्या मानांकित मांडेगर फरजामीचा 3-6 6-3 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव केला. अव्वल मानांकित भारताच्या माया राजेश्वरन रेवती हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत स्लोवाकियाच्या सातव्या मानांकित यास्मिन वावरोवाचा 6-2 6-4 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. अकराव्या मानांकित कझाकस्तानच्या अरीना गोगुलीना हिने भारताच्या हर्षिनी एन नागराजवर 3-6 6-0 6-0 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. लक्ष्मीसिरी दांडू हिने दिया रमेशचा 6-4 6-4 असा पराभव केला.
निकाल: उपांत्यपूर्व फेरी: मुले: एकेरी:
हिरोमासा कोयामा (जपान)[16] वि.वि.कंदवेल महालिंगम अकिलांडेश्वरी (भारत)6-1 7-5
अर्णव पापरकर (भारत)वि.वि.काझुमा किमुरा (जपान) [4] 6-1 6-1
मोइस कौमे (फ्रांस)[15]वि.वि. अर्जुन पंडित (भारत) [11]6-4 6-4
क्रिश त्यागी (भारत) [2] वि.वि.भूषण होबाम(भारत)6-2 2-6 6-2
मुली:
अमोदिनी नाईक (भारत)वि.वि.मांडेगर फरजामी (इराण)[2]3-6 6-3 6-1
माया रेवती(भारत)[1] वि.वि.यास्मिन वावरोवा (स्लोवाकिया) [7]6-2 6-4
अरीना गोगुलीना(कझाकस्तान)[11]वि.वि. हर्षिनी एन नागराज (भारत) 3-6 6-0 6-0
लक्ष्मीसिरी दांडू (भारत)वि.वि.दिया रमेश (भारत)6-4 6-4;
दुहेरी गट: मुले: उपांत्यपूर्व फेरी:
काझुमा किमुरा/इव्हान इउत्किन [1] वि.वि.सेहजसिंग पवार/ आर कूथरट[6] 6-1, 6-2;
हितेश चौहान/रेथिन सेंथिल कुमार (भारत) पुढे चाल वि.ए डस्कालोविक/मोइस कौमे(फ्रांस)
विहान रेड्डी/देबासिस साहू(भारत)[7] वि.वि.डॅनियल स्टेपानोव्ह(इंडोनेशिया)[4] 6-1, 6-0;
क्रिश त्यागी/काहिर वारिक(भारत)[2] वि.वि.तनिष्क जाधव/स्मित पटेल(भारत) 3-6, 6-3 [10-8].
(India’s Arnav, Krish, Maya, Amodini, Lakshmisiri enter semifinals at Gadre Marine-MSLTA ITF Grade 3 Kumar Tennis Championship)
महत्वाच्या बातम्या –
नोव्हेंबरच्या आयसीसी प्लेअर ऑफ द मंथसाठी हे तीन दावेदार, भारतीय चाहत्यांमध्ये जळफळाट
‘त्याने 20 किलो वजन कमी केले, तर मी त्याला…’, असगरने सांगितला धोनीसोबतचा Asia Cup 2018मधील मजेशीर किस्सा