---Advertisement---

व्हिडिओ: “कैसे लगा उस्ताद?” फिल्डिंग कोच श्रीधरनी पदार्पणवीर सिराजची घेतली खास हैद्राबादी ढंगात मुलाखत

---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला आज (२६ डिसेंबर) मेलबर्नच्या मैदानावर सुरुवात झाली. या सामन्यात भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने कसोटी पदार्पण केले. खडतर परिस्थितीवर मात करत सिराजने आपले भारताकडून कसोटी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न साकार केले. इतकेच नव्हे तर पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्या डावात २ बळी घेत ऑस्ट्रेलियाचा डाव १९५ धावांवर गुंडाळण्यात महत्वाची भूमिका बजावली.

या कामगिरीमुळे सिराज नक्कीच खुश होता. मात्र आज मैदानावर त्याच्या मनात नक्की काय चालू होते, हे जाणून घेणारी मुलाखत भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी घेतली. श्रीधर यांनी खास हैद्राबादी ढंगात सिराजला प्रश्न विचारले, ज्याची सिराजने दिलखुलास उत्तरे दिली. हा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या ऑफिशिअल अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

या मुलाखतीत श्रीधर यांनी सिराजला पदार्पण केल्यानंतर नेमकी काय भावना होती असे विचारले असता तो म्हणाला, “भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळायला मिळणे हे माझे स्वप्न होते. ते पूर्ण झाल्याचे पाहून मला अतिशय आनंद झाला होता. माझे १००% द्यायचे मी ठरविले होते. अजिंक्य रहाणे आणि जसप्रीत बुमराह हे दोघेही माझ्याशी सतत संवाद साधत होते, त्यांच्यामुळे मला योग्य प्रकारे गोलंदाजी करण्यास मदत झाली.”

विशेष म्हणजे सिराजला पहिल्या सत्रात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. याबाबत विचारले असता तो म्हणाला, “कसोटी क्रिकेटमधला पहिला चेंडू टाकण्यासाठी मी आतुर होतो. मात्र खेळपट्टीत किंचित ओलावा असल्याने फिरकीपटूंना मदत मिळत होती. त्यामुळे मी त्याबाबत फारसा विचार न करता रनआऊटच्या माध्यमातून वगैरे संघासाठी योगदान देण्यावर लक्ष केंद्रित करत होतो. त्यामुळे जेव्हा मला गोलंदाजी करण्यास मिळाली, तेव्हा मी ताजातवाना होतो.”

पाहा व्हिडिओ:

https://twitter.com/BCCI/status/1342794285234618369

भारतीय गोलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीमुळे पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाचा डाव अवघ्या १९५ धावांवर संपुष्टात आला. त्यांनतर ११ षटके खेळायला मिळालेल्या भारतीय संघाने दिवसाखेर १ बाद ३६ धावा केल्या आहेत. युवा सलामीवीर शुबमन गिल २८ तर चेतेश्वर पुजारा ७ धावांवर नाबाद आहेत.

महत्वाच्या बातम्या:
– IND vs AUS : पहिल्या दिवसाखेर भारताच्या १ बाद ३६ धावा, पदार्पण करणाऱ्या शुबमन गिलची शानदार सुरुवात
– बापरे! सिराजने वेगाने टाकलेला चेंडू आदळला ऑस्ट्रेलियन फलंदाजाच्या हेल्मेटवर अन्
त्याची बॅट क्रीजच्या आत आलीच नव्हती, टीम पेनबाबत दिलेल्या चुकीच्या निर्णयावर शेन वॉर्नची प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---