---Advertisement---

‘या’ फलंदाजांच्या फॉर्मचं करायचं तरी काय? भारताचे प्रमुख शिलेदार सातत्याने ठरतायेत अपयशी

On: रविवार, मार्च 7, 2021 11:41 PM
---Advertisement---

नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवला. यासह चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत देखील भारताने २-१ ने विजय मिळवला आहे. यामुळे भारतीय संघाने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत देखील प्रवेश केला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत युवा खेळाडूंचा बोलबाला होता. पण या मालिकेत संघातील मुख्य खेळाडूंना धावा करण्यात अपयश आल्यामुळे अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत. या मालिकेत भारतीय संघाच्या गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परंतु संघातील काही मुख्य फलंदाजांना धावा करण्यात अपयश आले आहे.

अजिंक्य रहाणे –

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये पहिला कसोटी सामना झाल्यानंतर, विराट कोहली पितृत्व रजा घेत माघारी परतला होता. त्यानंतर अजिंक्य रहाणेने संघाची जबाबदारी स्वीकारली होती. तसेच ती योग्यरित्या पार देखील पाडली होती. त्याने मेलबर्नमध्ये ११२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. त्यानंतर भारतीय संघाने ती मालिका २-१ ने आपल्या नावावर केली होती. पण नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अजिंक्य रहाणेला फलंदाजीमध्ये काही सूर गवसला नाही. त्याने मालिकेतील चार सामन्यात ६७ धावांची सर्वाधिक खेळी करत अवघ्या ११२ धावा केल्या आहेत.

चेतेश्वर पुजारा –

भारतीय संघामध्ये ‘भिंत’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला अवघ्या १३३ धावा करता आल्या. यात तो दोन वेळा ० धावा करत माघारी परतला आहे. तसेच शेवटचे शतक करून त्याला दोन वर्ष उलटली आहेत. पुजाराने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एकूण १९३ धावा केल्या होत्या.

विराट कोहली –

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली गेल्या काही महिन्यांपासून शतकाच्या प्रतीक्षेत आहे. त्याने शेवटचे शतक २०१९ मध्ये बांगलादेश संघाविरुद्ध झळकावले होते. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एकच सामना खेळला होता. त्या सामन्यात त्याने अर्धशतकिय खेळी केली होती. तसेच नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने २ अर्धशतक झळकावले आहेत. त्यामुळे तो शतक केव्हा झळकावेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

रोहितची पलटण करणार आयपीएल २०२१ चा श्रीगणेशा, आरसीबीविरुद्ध होणार पहिली लढत; पाहा मुंबईचे पूर्ण वेळापत्रक

जो रुटचे मोठे मनं! पराभवानंतरही भारताला दिल्या कसोटी चॅम्पियशीपसाठी शुभेच्छा; म्हणाला

जयसूर्याचे लाजवाब क्षेत्ररक्षण पाहून लाराला आवरला नाही कौतुक करण्याचा मोह, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---