भारतीय संघ सध्या विश्रांतीवर आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव मिळाला. त्यानंतर तब्बल एक महिना संघ कुठलीच मालिका खेळणार नाही अशे समजले. पुढच्या महिन्यात संघ वेस्ट इंडीज दौरा करेल, ज्यामध्ये एकूण 10 सामने खेळले जाणार आहेत. दौऱ्यात सुरुवातील दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघ कोणत्या प्लेइंग इलेव्हनविषयी उतरणार, हा प्रश्न सध्या चाहत्यांना पडला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार संघ व्यवस्तापन या मालिकेसाठी संघात जास्त बदल करणार नाही, पण काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
माध्यमांतील वृत्तांनुसार कसोटी मालिकेसाठी रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांची प्लेइंग इळेव्हनमधील जागा पक्की मानली जात आहे. चेतेश्वर पुजाराचे संघातील स्थान मात्र निश्चित मानले जात नाहीये. तसेच भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिला सामना डोमिनिकामध्ये, तर दुसरा सामना त्रिनिदादमध्ये खेळला जाणार आहे. याठिकाणी चेतेश्वर पुजाराचा फॉर्म संघासाठी चिंतेची बाब ठरू शकतो. मागच्या 28 कसोटी सामन्यांमध्ये पुजाराच्या बॅटमधून फक्त एक शतक आल्याचे पाहायला मिळाले आहे.
आकडेवारी पाहता चेतेश्वर पुजाराच्या जागी यशस्वी जयस्वालला संघात सामील केले जाऊ शकते. असेही मानले जात आहे की, पुजाराने संघात जागा जरी मिळवली, तरी प्रत्यक्षात त्याला खेळम्याची संधी मिळेल, याची खूपच कमी शक्यता आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत कसोटी मालिकेतून युवा यशस्वी जयस्वालला पदार्पणाची संधी मिळू शकते. जयस्वालने इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगाम राजस्थान रॉयल्ससाठी चांगलाच गाजवला होता. त्याव्यतिरिक्त वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यालाही कसोटी मालिकेत संधी मिळण्याची शक्यता खूपच कमी सांगितली जात आहे. वेस्ट इंडीजविरुद्धची ही कसोटी मालिका 12 जुलै रोजी सुरू होणार आहे. त्यानंतर 27 जुलै रोजी उभय संघांतील वनडे, तर 3 ऑगस्ट रोजी टी-20 मालिकेला सुरुवात होईल. 13 ऑगस्टला भारतीय संघ वेस्ट इंडीजमध्ये शेवटचा सामना खेळेल. (India’s playing XI could be ‘like this’ in the Test series against West Indies)
महत्वाच्या बातम्या –
पुणेरी पलटन पहिल्याच सामन्यात गतविजेत्यांना भिडणार, अल्टिमेट टेबल टेनिसचे वेळापत्रक जाहीर
इतिहास घडला! तलवारबाज भवानी देवीने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पदक केले निश्चित, बनली पहिलीच भारतीय