भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघात 4 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. त्यातील पहिला सामना आज (8 नोव्हेंबर) रोजी किंग्समीड या स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्याची सुरूवात रात्री (8:30) वाजता होणार आहे. भारतीय संघ कर्णधार सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग कशी असू शकते? हे जाणून घेऊया.
या सामन्यात संजू सॅमसन (Sanju Samson) आणि अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) यांच्यावर सलामीची जबाबदारी असू शकते. याआधी संजू सॅमसनने बांगलादेशविरूच्द्धया टी20 मालिकेत भारतासाठी सलामी दिली होती. जिथे त्याने शानदार शतक झळकावले होते.
त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) तिसऱ्या क्रमांकावर दिसू शकतो. चौथ्या क्रमांकावर तिलक वर्मा (Tilak Verma), तर अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो. सहाव्या क्रमांकावर जितेश शर्मा (Jitesh Sharma) आणि सातव्या क्रमांकावर रिंकू सिंह (Rinku Singh) फिनिशरच्या भूमिकेत दिसू शकतात. आठव्या क्रमांकावर रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) फिरकी गोलंदाजाच्या भूमिकेत दिसू शकतो.
रवी बिश्नोई व्यतिरिक्त भारताच्या गोलंदाजीमध्ये 3 वेगवान गोलंदाजांची निवड केली जाऊ शकते, ज्यामध्ये अर्शदीप सिंग (Arshdeep Singh), यश दयाल (Yash Dayal) आणि वैशाख विजयकुमार (Vyshak Vijay Kumar) यांच्या नावाचा समावेश केला जाऊ शकतो. यश दयाल आणि आणि वैशाख विजयकुमार आज (8 नोव्हेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतात.
अशी असू शकते भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, जितेश शर्मा, रिंकू सिंह, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वैशाख विजयकुमार, यश दयाल
महत्त्वाच्या बातम्या-
VIDEO; ‘या’ महान क्रिकेटपटू पुढे झुकला होता विराट कोहली, स्वत:च सांगितला किस्सा
आयपीएलमध्ये सर्वोच्च धावसंख्या ठोकणारे (टाॅप-5) खेळाडू
“मी रोहित शर्माकडून नेतृत्वगुण शिकलो”, टी20 कर्णधाराची कबूली