भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षीत बॉर्डर गावसकर ट्रॉफी गुरुवार (9 फेब्रुवारी) सुरू होईल. उभय संघांतील या चार सामन्यांची कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये खेळला जाईल. पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनविषयी अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) चर्चा करून पहिल्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन निवडतील. कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या 17 सदस्यीय संघातील 6 खेळाडूंना बाकावर बसावे लागणार आहे.
उभय संघांतील हा पहिला कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. पहिल्या सामन्यासाठी भारताचा उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) याने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राहुलने सांगितल्यानुसार पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनचे चित्र अद्याव स्पष्ट नाहीये. सामन्याला अवघे काही तास राहिले असताना संघाचा यष्टीरक्षक फलंदाज देखील निश्चित केला गेला नाहीये. केएस भरत याला ईशान किशनपेक्षा अधिक प्राधान्य दिले जाऊ शकते. तसेच सूर्यकुमार यादव गुरुवारी (9 फेब्रुवारी) कसोटी पदार्पण करणार, हे जवळपास निश्चित आहे. संघात असे काही खेळाडूही आहेत, ज्यांना पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार नाही.
रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या खेळाडूंना बनवणार बाकावर –
बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी काही दिवसांपूर्वी संघ घोषित केला. या 17 सदस्यीय संघातील 11 खेळाडूंना प्रत्यक्ष खेळण्याची संधी मिळणार असून सहा खेळाडू बाकावर बसलेले असतील. संघातून बाहेर बसणाऱ्या सहा खेळाडूंमध्ये काही मोठ्या नावांचाही समावेश आहे. शुबमन गिल, श्रेयस अय्यर, ईशान किशन, अक्षर पटेल, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट यांना बाकावर बलवण्याची शक्यता आहे.
भारतीय संघाची संभावित प्लेइंग इलेव्हन –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
(India’s probable playing XI for the first Test match against Australia)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“मला त्या दोघांमधील टशन पाहायचे आहे”, भारतीय दिग्गजाने व्यक्त केली इच्छा
नागपुरात ऑस्ट्रेलियाच देणार टीम इंडियाला सरप्राईज! 35 वर्षांपूर्वीची रणनिती पुन्हा आजमावणार