क्रिकेटजगतात संपूर्ण वर्षभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत असतात. तीन विश्वचषक 2022 या वर्षात खेळले गेले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करणार आहे. त्यासाठी त्यांनी नामांकने जाहीर करण्यास सुरुवात केली. आयसीसीने यावेळी प्रथम चालू वर्षात चमकदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना देण्यात येणाऱ्या उदयोन्मुख खेळाडूच्या पुरस्कारासाठीची नामांकने जाहीर केली आहेत.
वर्षभरात काही युवा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली विशेष छाप पाडली. त्यापैकी पुरुष व महिला गटातून प्रत्येकी चार खेळाडूंना आता आयसीसीने 2022 वर्षातील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू पुरस्कारासाठी नामांकित केले. महिला क्रिकेटच्या नामांकनांमध्ये भारताची युवा वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर व डावखुरी फलंदाज यास्तिका भाटिया यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाची डार्सी ब्राऊन व इंग्लंडच्या ऍलिस कॅप्सी यांना देखील नामांकन मिळाले.
भारतीय गोलंदाज रेणुका सिंगने यावर्षी वनडे क्रिकेटमध्ये 4.62 च्या इकॉनॉमीसह 18 बळी मिळवले. तर टी20 मध्ये 6.50 च्या इकॉनॉमीसह 22 बळी आपल्या नावे केले. दुसरीकडे, यास्तिका भाटियाने यावर्षी वनडेमध्ये 73.29 च्या स्ट्राइक रेटने 376 धावा केल्या आहेत. टी20 मध्ये 80.02 च्या स्ट्राईक रेटने 49 धावा तिने चोपल्या.
इंग्लंडच्या ऍलिसने वनडेमध्ये 80 आणि टी20 मध्ये 234 धावा केल्या. पहिल्या 3 टी20 सामन्यातच तिने 119 धावा केलेल्या. ऑस्ट्रेलियाच्या डार्सी ब्राऊनने कसोटी क्रिकेटमध्ये 2 आणि वनडेमध्ये 4.90 च्या इकॉनॉमीसह 10 आणि 6.20 च्या इकॉनॉमीसह 12 टी20 विकेट घेतल्या.
पुरुष खेळाडूंच्या नामांकनांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा युवा अष्टपैलू मार्को जेन्सन, भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, अफगाणिस्तानचा इब्राहिम झादरान व न्यूझीलंडच्या फिन ऍलन यांचा समावेश आहे.
(Indias Renuka Singh And Yastika Bhatia Nominated For ICC Womens Emerging Player Of The 2022)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताविरुद्धचा पराभव जिव्हारी! बांगलादेशच्या हेड कोचने दिला राजीनामा
भारताचे कसोटी स्टार आयसीसी क्रमवारीत चमकले, अय्यरने घेतली 10 स्थानांची झेप