ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या स्पर्धेत भारत उपांत्य फेरीच्या पराभवाने बाहेर झाला. ऍडलेडवर खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात इंग्लंडने तब्बल 10 विकेट्सने सामना जिंकला. या सामन्यात भारताच्या पराभवाचे कारण गोलंदाजांना ठरवले गेले होते, मात्र इंग्लंडच्या खेळाडूने गोलंदाजी नाही तर ढिसाळ फलंदाजीमुळे भारत हरला असे चकित करणार विधान केले आहे.
इंग्लंडचा सलामीवीर ऍलेक्स हेल्स (Alex Hales) याने भारताच्या फलंदाजांनी जर 30-40 धावा अधिक केल्या असत्या तर इंग्लंडसाठी आव्हानात्मक ठरले असते.
या स्पर्धेत भारताने रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली खेळताना पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध थरारक विजय मिळवला होता. त्यानंतर संघ ग्रुपमध्ये पहिल्या स्थानावर राहिला आणि उपांत्य फेरीत इंग्लंडशी भिडला. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने हेल्सच्या साथीने 4 षटके बाकी असताना 169 धावांची भागीदारी केली.
हेल्सने उपांत्य सामन्यात 47 चेंडूमध्ये नाबाद 86 धावा केल्या, तर दुसऱ्या बाजूने बटलरने 49 चेंडूत नाबाद 80 धावा केल्या. या विजयाबरोबरच त्यांनी अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभूत करत दुसऱ्यांदा टी20 विश्वचषकाचे विजेतपद पटकावले.
वर्च्युअल मीडिया पत्रकार परिषदेत हेल्सने इंग्लंड-भारताच्या उपांत्य फेरीतील कामगिरीचे वर्णन केले. त्याने म्हटले, “खरचं सांगतो, भारताला 30 धावा कमी पडल्या. याचे श्रेय आमच्या गोलंदाजांना जाते, कारण मला वाटत होते भारत 190च्या आसपास लक्ष्य देईल.”
“जेव्हा तुम्ही ऍडलेडवर 170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करता तेव्हा ते सोपे वाटते. भारताची गोलंदाजी कमी पडली असे नाही तर जे लक्ष्य दिले ते आमच्यासाठी सोपे वाटले,” असेही हेल्सने पुढे म्हटले.
विश्वचषकानंतर भारताचे काही खेळाडू मायदेशी परतले, तर काही खेळाडू न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेले. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियातच तळ ठोकला. त्या मालिकेतील पहिले दोन सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले असून मालिका खिशात टाकली आहे. T20 WC: India’s Semi-Final Defeat Caused By Batting not Bowling, Shocking Statement From Alex Hales
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अश्विनपाठोपाठ कार्तिकनेही घेतली द्रविडची बाजू; म्हणाला, ‘2023च्या वनडे विश्वचषकानंतर मला…..’
गिलने सांगितली रिषभ-उर्वशी वादाची सत्यता; म्हणाला, “तिलाच वाटते…”