ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (AUSvSA) यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील शेवटचा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (4 जानेवारीपासून)सुरू आहे. या सामन्याच्या निकालावर भारतीय चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. कारण हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर भारताचा आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2021-23च्या अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित होणार आहे.
सध्या या सामन्यावर पावसाचे सावट आले आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ एकही चेंडू न टाकता संपला. यामुळे दोन दिवस बाकी असून ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सुरू आहे. भारताबरोबर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याचीही चिंता वाढली आहे. त्याने दुसऱ्या दिवसाच्या शेवटी नाबाद 195 धावा केल्याने त्याला द्विशतकासाठी केवळ पाच धावांची आवश्यकता आहे.
सिडनीमधील स्थानिक हवामान विभागाने पुढील दोन दिवस पाऊस पडणार अशी शक्यता दर्शवली आहे. यामुळे हा सामना अनिर्णीत राहण्याची दाट शक्यता आहे. समजा हा सामना अनिर्णीत राहिला तर भारताच्या अडचणीत वाढ होतील. कारण अनिर्णीत निकालामुळे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुण वाटून दिले जातील. ज्याचा परिणाम टक्केवारींवर होणार आहे.
Play has been called off for day three in Sydney!#AUSvSA | #WTC23 pic.twitter.com/5TWoQscBZe
— ICC (@ICC) January 6, 2023
कसोटी चॅम्पियनशीप 2021-23च्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया 78.57 टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहे, तर भारत 58.93 टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच श्रीलंका 53.33 टक्केवारीमुळे तिसऱ्या आणि दक्षिण आफ्रिका 50 टक्केवारीमुळे चौथ्या स्थानावर आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया जिंकला, तर फायदा भारताचा आहे. मात्र सामना अनिर्णीत राहिला किंवा दक्षिण आफ्रिकेने जिंकला तर भारताच्या अडचणी वाढणार आहेत.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 4 विकेट्स गमावत 475 धावा केल्या आहेत. त्यामध्ये ख्वाजाबरोबर स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) यानेही शतकी खेळी केली आहे. स्मिथ 104 धावा करत बाद झाला. हे त्याचे कसोटीतील 30वे शतक होते. त्याच्याआधी मार्नस लॅब्यूशेन 79 धावा करत तंबूत परतला. तत्पूर्वी, या सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळही अंधूक प्रकाशामुळे लवकर संपला होता. यामध्ये आतापर्यंत केवळ 131 षटकांचाच खेळ झाला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते ‘महाराष्ट्र केसरी’च्या लोगोचे अनावरण
जय शाहवर भडकले पीसीबीचे अध्यक्ष! म्हणाले, ‘आशिया चषकाचे सांगितले आता आमच्या पीएसएलच्या…’