वेलिंग्टन। आज(24 फेब्रुवारी) भारताला न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात 10 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ 0-1 ने पिछाडीवर आहे.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली होती. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली प्रथम फलंदाजी करताना कसोटी सामन्यात पराभूत होण्याची भारतीय संघाची ही केवळ दुसरीच वेळ आहे.
याआधी 2018ला इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्सला झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजी केल्यानंतरही एक डाव आणि 159 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता.
आत्तापर्यंत विराटच्या नेतृत्वाखाली भारताने खेळताना 33 कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी केली आहे. यातील 27 सामन्यात भारताने विजय मिळवले आहेत. तर 4 सामने अनिर्णित राहिले आहेत आणि 2 सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे.
कसोटी चॅम्पियनशीपमधील टीम इंडियाचा पहिला पराभव; जाणून घ्या किती आहेत गुण
वाचा👉https://t.co/MR3sRkDtuq👈#म #मराठी #cricket #INDvsNZ #TeamIndia #TestChampionship— Maha Sports (@Maha_Sports) February 24, 2020
महिला टी२० वर्ल्डकप: आज टीम इंडियाचा सामना बांगलादेशविरुद्ध; जाणून घ्या सर्वकाही…
वाचा👉https://t.co/mgsRaNEslw👈#म #मराठी #cricket #TeamIndia #T20WorldCup #INDvBAN— Maha Sports (@Maha_Sports) February 24, 2020