आयसीसी वनडे विश्वचषक 2023चा अंतिम सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये हा महामुकाबला खेळला जाणार आहे. रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना पाहण्यासाठी एक लाखापेक्षा अधिक चाहते जमणार आहेत. तत्पूर्वी भारतीय संघाची डोकेदुखी वाढवणारी एक बातमी समोर येत आहे.
भारत यावर्षी विश्वचषक स्पर्धेचा यजमान संघ होता. भारतात खेळली जात असलेली ही स्पर्धा भारतीय संघाने गाजवली. हंगामात यावर्षी खेळलेल्या एकूण 9 सामन्यांपैकी 9 सामने भारताने जिंकले आहेत. अंतिम सामन्यात मात्र भारतासमोर बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघ असणारआ हे. या सामन्याविषयी चाहत्यांच्या मनातील उत्सुकता वाढत चालली आहे. पण अशातच पंचांची यादी समोर आल्यानंतर चाहत्यांची काही अंशी नाराशा झाल्याचे दिसते.
रिचर्ड कॅटलब्रॉ (इंग्लंड) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड) यांना विश्वचषकाच्या या अंतिम सामन्यासाठी मैदानी पंच म्हणून जबाबदारी सोपवली गेली आहे. तसेच तिसऱ्या पंचाची भूमिका जोएल विल्सन (वेस्ट इंडीज) पार पाडणार आहे. चौथे पंच ख्रिस गॅफनी आणि मॅच रेफरीच्या भूमिकेत अँडी पायक्राफ्ट असतील.
वनडे विश्वचषक 2023च्या अंतिम सामन्यासाठी पंच
मैदानी पंच: रिचर्ड कॅटरब्रॉ, रिचर्ड इलिंगवर्थ
तिसरे पंच: जोएल विल्सन
चौथे पंच: क्रिस गॅफनी
मॅच रेफरी: अँडी पायक्राफ्ट
दरम्यान, रिचर्ड कॅटलब्रॉ (Richard Kettleborough) यांचे नाव पाहताच चाहत्यांची चिंता वाढल्याचे दिसते. कारण यापूर्वी काही महत्वाच्या सामन्यांमध्ये कॅटलब्रॉ पंच असताना भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. 2019 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात कॅटलब्रॉ मैदानी पंच होते. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात एमएस धोनी धावबाद झाला, जो सामन्याची दिशा ठरवणारा निर्णय ठरला. भारताने या सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर कॅटलब्रॉ यांच्याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. 2021 टी-20 विश्वचषकाच्या देखील कॅटलब्रॉ भारतीय संघासाठी अडचण ठरले होते. यावर्षी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कॅटलब्रॉ तिसर्या पंचाच्या भूमिकेत होते. 2014 टी-20 विश्वचषक, 2015 वनडे विश्वचषक, 2016 टी-20 विश्वचषक, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी या सर्व स्पर्धांच्या नॉकआऊट सामन्यांमध्ये कॅटलब्रॉ भारतासाठी अनलकी ठरले आहेत. 50 वर्षीय कॅटलब्रॉ पंच बनण्याआधी क्रिकेट खेळले आहेत. 33 प्रथम श्रेणी आणि 21 लिस्ट ए सामन्यांमध्ये त्यांनी 1448 धावा केल्या आहेत. (India’s ‘unlucky’ umpire Richard Kettleborough will enter the field in the final match! The team will have to change the tradition)
यातून निवडली जाणार प्लेइंग इलेव्हन –
भारतीय टीम: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहूल, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर.
ऑस्ट्रेलिया: पॅट कमिंस (कर्णधार), स्टीव स्मिथ, एलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन एबॉट, मार्नस लॅबुशेन, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवूड, ट्रेविस हेड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, डेविड वॉर्नर, एडम झॅम्पा.
महत्वाच्या बातम्या –
प्रेरणादायी! जग जिंकायला निघालेल्या रोहितने शाळेच्या पुस्तकातही मिळवले स्थान; तुम्हीही म्हणाल, ‘भारीच ना’
नरेंद्र मोदी स्टेडियमवर राष्ट्रगीतासह एयर शो, रोहितही होता उपस्थित; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ