भारतीय संघाच्या (team india) दक्षिण अफ्रिका दौऱ्याची (india tour of south africa) सुरुवात विजयाने झाली आहे. गुरुवारी (३० डिसेंबर) भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ११३ धावांनी विजय मिळवला. या विजयासोबत भारतीय संघाने कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. हा त्यांचा एका वर्षातील ८ वा कसोटी सामना आहे, ज्यामध्ये भारतीय संघाने विजय मिळवला. एवढेच नाही, तर आशिया खंडाबाहेर यावर्षी भारताने तब्बल चार कसोटी सामने जिंकले. कसोटी क्रिकेटमध्ये भारताने यावर्षी केलेली ही कामगिरी उल्लेखनीय आहे आणि इतिहासात नोंदवली गेली आहे.
भारतीय संघाचा कसोटी क्रिकेटमधील इतिहास पाहिला, तर यावर्षी संघाने चांगली कामगिरी केली आहे. यावर्षी भारतीय संघाने एकूण खेळलेल्या सामन्यांपैकी ८ कसोटी सामने जिंकले आहेत. संघाच्या आजपर्यंतच्या इतिहासातील ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. यापूर्वी २०१६ मध्ये भारतीय संघाने सर्वोत्तम कसोटी प्रदर्शन केले होते, त्यावर्षी संघाने एकूण ९ कसोटी सामने जिंकले होते. तर २०१० मध्ये ८ कसोटी सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला होता.
यावर्षी आशिया खंडाच्या बाहेर खेळलेल्या कसोटी सामन्यांपैकी भारतीय संघाचा हा चौथा विजय ठरला आहे. ही दुसरी वेळ आहे, जेव्हा भारतीय संघाने एका वर्षात आशिया खंडाच्या बाहेरच्या देशांमध्ये चार कसोटी विजय नोंदवले आहेत. यापूर्वी भारताने २०१८ मध्ये आशिया खंडाच्या बाहेर चार कसोटी विजय मिळवले होते.
हेही वाचा- फ्लॅशबॅक २०२१: क्रिकेट विश्वात वर्षभरात उफाळलेल्या ‘या’ ५ वादांची झाली सर्वाधिक चर्चा
दरम्यान, दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याचा विचार केला, तर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात भारतीय संघाने ३२७ धावा केल्या, प्रत्युत्तरात दक्षिण अफ्रिका संघ १९७ धावांवर सर्वबाद झाला होता. पहिल्या डावात मोठी आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघ अवघ्या १७४ धावांवर सर्वबाद झाला. दक्षिण अफ्रिकेला शेवटच्या डावात विजयासाठी ३०५ धावांचे लक्ष्य मिळाले होते, पण पुन्हा एकदा संघ स्वस्तात बाद झाला आणि भारताने विजय मिळवला. शेवटच्या डावात दक्षिण अफ्रिकेने १९१ धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या –
बाबा विराटला चीयर करण्यासाठी पहिल्यांदाच वामिका स्टेडियममध्ये, आई अनुष्कासोबत कॅमेरात कैद
“याला आत्ताच बाद करायचं”, विराटने दिले आदेश अन् बुमराहने केला चमत्कार
भारतीय संघाला नवीन चेंडू सांगून दिलेला जुना चेंडू? वाचा काय नेमकं प्रकरण
व्हिडिओ पाहा –