---Advertisement---

बीसीसीआयने दाखवून दिली ताकद! अखेर आयसीसीला बदलावा लागला ‘तो’ निर्णय

On: सोमवार, मार्च 27, 2023 3:15 PM
---Advertisement---

इंदोर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघादरम्यान बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामना खेळला गेला होता. हा सामना केवळ तिसऱ्याच दिवशी पहिल्या सत्रात समाप्त झाला. ऑस्ट्रेलियन संघाने यजमान भारतीय संघाला या सामन्यात पराभूत केलेले. या सामन्यातील खेळपट्टीवर अनेकांनी टीका केलेली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) खेळपट्टीला खराब असा शेरा दिलेला. त्याविरुद्ध भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केलेले अपील आता आयसीसीने मान्य केले असून, हा शेरा बदलण्यात आला आहे.

मालिकेतील पहिले दोन सामने एकतर्फी जिंकलेला भारतीय संघ पहिल्या डावात केवळ 109 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात उस्मान ख्वाजाच्या फलंदाजीच्या जोरावर 88 धावांची आघाडी मिळवली. भारतीय संघाने दुसऱ्या डावातही केवळ 163 धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला विजयासाठी 76 धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान पार करताना ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवशी फक्त एक बळी गमावत 18.5 षटकातच 78 धावा करून सामना जिंकला. यासह मालिका देखील 2-1 अशा फरकावर आली.

सामना संपल्यानंतर आयसीसीने सामन्यासाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्टीला शेरा दिला. या खेळपट्टीवर पहिल्याच दिवशीपासून चेंडू अधिक फिरकी घेत होता. तसेच, खेळपट्टीवरील माती देखील अगदी पहिल्या षटकात निघालेली दिसली. त्यामुळेच आयसीसीने या खेळपट्टीला खराब असा शेरा दिलेला. त्या विरोधात बीसीसीआयने लगोलग अपील केले होते.

 

बीसीसीआयने आपले म्हणणे मांडताना सांगितले, इंदोर खेळपट्टी खराब नव्हती. मालिकेतील पहिले दोन सामने देखील अशाच पद्धतीने पार पडलेले. इतकेच नव्हे तर यावेळी जिंकणारा संघही वेगळा होता. या युक्तिवादानंतर आयसीसीने खराब हा शेरा काढून सरासरीपेक्षा कमी असा शेरा दिला. त्यामुळे खेळपट्टीचे तीन डीमेरिट पॉईंट कमी करून केवळ एक डीमेरिट पॉईंट करण्याचा निर्णय घेतला गेला.

(Indore Test Pitch Rating Changed By ICC After BCCI Appeal)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सच्या विजयाला वादाची काळी किनार! शफालीला बाद देण्यावरून उलटसुलट चर्चा सुरू 
नॅट सिव्हरची पैसा वसूल कामगिरी! 3.20 कोटींच्याच दर्जाचा खेळ दाखवत बनवले मुंबईला चॅम्पियन 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---