---Advertisement---

सुपर कॅच! पुजाराचा अफलातून झेल घेत स्टोक्सने दिले भारताला टेंशन, पाहा व्हिडिओ

On: मंगळवार, फेब्रुवारी 9, 2021 12:37 PM
---Advertisement---

चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक स्टेडियम) येथे होत असलेल्या या सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने भारताचा कसोटीपटू चेतेश्वर पुजाराचा एक शानदार झेल घेतला.

भारताने पाचव्या दिवशी दुसऱ्या डावातील १३ व्या षटकापासून आणि १ बाद ३९ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. भारताकडून चौथ्या दिवशी नाबाद असलेली शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजाराची जोडी फलंदाजीसाठी मैदानात उतरली. या दोघांनी पाचवा दिवस सुरु झाल्यानंतरची पहिली ५ षटके चांगली खेळली होती. मात्र, डावाच्या २० व्या जॅक लीचने पुजाराला स्टोक्सकरवी झेलबाद केले.

लीचने टाकलेल्या चेंडूवर पुजाराने रक्षात्मक खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन स्लीपमध्ये उभ्या असलेल्या स्टोक्सकडे गेला. स्टोक्सनेही चूक न करता डावीकडे झुकत शानदार झेल घेतला. त्यामुळे पुजाराला ३८ चेंडूत १ चौकारासह १५ धावा करुन बाद व्हावे लागले.

भारताने पहिल्या सत्रात गमावल्या ५ विकेट्स –

पुजारा बाद झाल्यानंतर काहीवेळातच २७ व्या षटकात जेम्स अँडरसनने भारताला २ जबरदस्त धक्के दिले. त्याने अर्धशतक करणाऱ्या शुबमन गिल आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेला त्रिफळाचीत केले. शुबमन ५० धावा करुन तर रहाणे शुन्यावर बाद झाला. अँडरसन एवढ्यावरच थांबला नाही. त्याने रिषभ पंतला ३३ व्या षटकात शॉर्ट लेगला उभ्या असलेल्या जो रुट करवी झेलबाद केले. त्यापाठोपाठ डॉमनिक बेस या फिरकीपटूने वॉशिंग्टन सुंदरला शुन्यावर बाद करत भारताला सहावा धक्का दिला.

यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने आर अश्विनला साथीला घेत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पहिल्या सत्राखेरपर्यंत आणखी विकेट जाऊ दिली नाही. पहिल्या सत्राखेर भारताने दुसऱ्या डावात ३९ षटकात ६ बाद १४४ धावा केल्या आहेत. अद्याप भारताला विजयासाठी २७६ धावांची गरज आहे. तर इंग्लंडला ४ विकेट्सची गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

अंडरसन ऑन फायर! एकाच षटकात उडवली गिल आणि रहाणेची दांडी, पाहा भन्नाट व्हिडिओ

अरे बापरे! ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्या घरी चोरी, महागडी कार लंपास

हीच ती वेळ, लढा आणि जिंका! चेन्नई कसोटीबाबत टीम इंडियाची अंतिम चर्चा, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---