अहमदाबाद। भारताने गुरुवारी (१८ मार्च) इंग्लंडविरुद्ध चौथ्या टी२० सामन्यात ८ धावांनी विजय मिळवला. ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील हा चौथा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला. पण अखेर भारताने अखेरच्या षटकात विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे मालिकेत आता २-२ अशी बरोबरी झाली आहे. दरम्यान, गुरुवारी भारताच्या विजयाबरोबर या सामन्याच्या शेवटच्या काही षटकात भारताचा कर्णधार विराट कोहली मैदानावर अनुपस्थितीत असल्याची चर्चा झाली.
विराट सामन्याच्या शेवटच्या ४ षटकांत मैदानातून बाहेर गेला होता. त्यामुळे उपकर्णधार रोहित शर्माने त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली. विशेष म्हणजे विराट बाहेर गेला त्यावेळी इंग्लंडला केवळ ४६ धावांची गरज होती. पण रोहितने नेतृत्वाची चुणूक दाखवत भारताला विजय मिळवून दिला.
मात्र, विराट मैदानाबाहेर का गेला होता, अशी चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. अखेर सामन्यानंतर स्वत: विराटनेच तो का बाहेर गेला होता, याबद्दल खुलासा केला आहे. विराटने सांगितले की त्याने संभावित दुखापत टाळण्यासाठी हा निर्णय घेतला होता.
तो म्हणाला, ‘मी चेंडूमागे जेव्हा धावलो आणि तो फेकण्यासाठी डाईव्ह मारली. तर, मी बहुधा सर्वोत्तम स्थितीत नव्हतो. पण मी आऊट फिल्डमधून बाहेर आलो आणि मी जेव्हा ३० यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करत होतो तेव्हा तापमान खरोखर लवकर खाली आले होते. त्यामुळे तुमचे शरीर ताठरते. त्यामुळे मी माझ्या वरच्या शरीराला कमी त्रास देण्याचा ठरवले. मला कोणत्याही प्रकारची दुखापत नको होती.’
तसेच त्याला कोणती दुखापत वैगरे झाली आहे का, असे विचारले असता तो म्हणाला, ‘हे काही गंभीर नाही. मी परवार्यंत ठिक होईल. कारण संध्याकाळी सामना आहे. त्यामुळे मैदानातून बाहेर जाणे हा हुशारीचा निर्णय ठरला. कारण पुढील महत्तावाचा सामना होणार आहे.’
शनिवारी (२० मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड संघात टी२० मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना होणार आहे. हा सामना निर्णायक सामना असेल. कारण मालिका सध्या २-२ अशी बरोबरीत आहे.
भारताने जिंकला चौथा सामना
चौथ्या टी२० सामन्यात भारताने २० षटकात सुर्यकुमार यादवच्या ५७ धावांच्या आणि श्रेयस अय्यरच्या आक्रमक ३७ धावांच्या खेळीमुळे ८ बाद १८५ धावा उभारल्या. तसेच इंग्लंडला १८६ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला २० षटकात ८ बाद १७७ धावाच करता आल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
आहा! ‘कजरारे’ गाण्यावर कृणाल पंड्याने लावले पत्नीसोबत ठुमके, डान्स पाहून तुमचेही थिरकतील पाय
सूर्यकुमार यादवला सकाळी कळली ‘ही’ गोष्ट, मग इंग्लंडला चोप चोपलं अन् ठरला सामनावीर
‘विश्वचषकातील स्थान पक्क,’ सूर्यकुमारच्या आक्रमक खेळीची भारतीय दिग्गजाला भुरळ; उधळली स्तुतिसुमने





