आशिया चषक 2022 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील महामुकाबला रविवारी (28 ऑगस्ट) रंगणार आहे. दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होणार आहे. फक्त भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट चाहतेच नव्हे तर संपूर्ण जगभरातील चाहत्यांच्या नजरा या सामन्यावर लागल्या आहेत. या हाय वोल्टेज सामन्याआधी भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव याने महत्त्वाचे प्रतिक्रिया दिली आहे.
भारत व पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे एखाद्या महायुद्धाप्रमाणे असतो. मैदानाबाहेर चांगलीच वातावरण निर्मिती झाली असताना, भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव याने हा देखील इतर सामन्यांप्रमाणेच एक सामना असल्याचे म्हटले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यात सूर्यकुमार बोलताना दिसतोय. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत बोलताना तो म्हणाला,
Wishes galore for @imVkohli ahead of his 100th T20I for #TeamIndia.
Listen in to what the team members have to say on his milestone game.#AsiaCup2022 #INDvPAK pic.twitter.com/uWloBWzBxI
— BCCI (@BCCI) August 28, 2022
“जेव्हापासून मला क्रिकेट समजते तेव्हापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यातबाबत नेहमी चर्चा होत असते. लोक म्हणतात की, ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. मात्र, जेव्हा आपण मैदानात जातो तेव्हा तो इतर सामन्यांसारखाच एक सामना दिसून येतो. जेव्हा तुम्ही मैदानात प्रवेश करता तेव्हा तुम्ही जी काही तयारी केली होती, ती तिथे दिसते. मी फलंदाजी करताना नेहमीच माझ्या झोनमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो.”
भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान या मैदानावर अखेरचा सामना 2021 टी20 विश्वचषकात झाला होता. त्या सामन्यात भारतीय संघाला दहा गड्यांनी मोठा पराभव पत्करावा लागलेला. त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी भारतीय संघाकडे असेल. भारत व पाकिस्तान व्यतिरिक्त या गटात पात्रता फेरी जिंकून आलेल्या हॉंगकॉंगचाही समावेश आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘पिक्चर अभी बाकी है!’ पहिला सामना जिंकल्यानंतर अफगाणिस्तानच्या कर्णधाराचे खास संकेत
एकही रुपया न भरता लाईव्ह पाहता येणार भारत-पाकिस्तान मॅच! फक्त कराव्या लागतील ‘या’ सोप्या गोष्टी
अल्टिमेट खो खो स्पर्धेत मुंबई खिलाडीज संघाची तेलगु योद्धाजवर मात