दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध भारताने (INDvSA) टी20 मालिकेत 2-1ने विजय मिळवला. यातील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी (4 ऑक्टोबर) इंदोर येथे खेळवला गेला. या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून 49 धावांनी पराभव स्विकारावा लागला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली, हे आता सर्वांनाच माहित आहे. यानंतर भारताच्या डगआउटमध्ये जे घडले त्याचा एक व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भारताच्या चांगलाच अंगलट आल्याचे दिसून आले कारण दक्षिण आफ्रिकेने रिली रौऊसो याच्या नाबाद शतकी खेळीवर 20 षटकात 3 विकेट्स गमावत 227 धावसंख्या उभारली. धावांचा पाठलाग करण्यात भारत ओळखला जातो, मात्र या सामन्यात भारताने निराशा केली. यावेळी भारताकडून सर्वाधिक धावा दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)याने केल्या, पण त्याने केलेल्या एका कृतीने भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने त्याला ठोसा मारला आहे. रोहितच्या जागी कोणीही असता तर त्याने असेच केले असते, असे तुम्हाला वाटत असेल. त्यासाठी आपण तो संपूर्ण प्रकार जाणून घेऊया.
झाले असे की, सामना संपल्यावर डगआऊटमध्ये कार्तिकने उभे राहुन टाळ्या वाजवल्या. त्यावेळी शेजारी उभे असलेल्या रोहितने मस्करीत त्याच्या पाठीत दणका मारला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की रोहित कसा चेष्टेमध्ये कार्तिकच्या पाठीत ठोसा मारतो. त्या दोघांची चेष्टामस्करी तेथेच थांबली नाही. बीसीसीआयनेही त्यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये दोघेही एकमेकांची फिरकी घेताना दिसतात.
Bro 😂😂
.@ImRo45 .@DineshKarthik pic.twitter.com/y6W1egfXjx— Manideep (@Manideep_Vanga) October 4, 2022
कार्तिकने या सामन्यात 219च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या तर रोहित शून्यावरच बाद झाला. कार्तिकने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत 21 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकार खेचत 46 धावा केल्या. भारत 18.3 षटकात 178 धावांवरच सर्वबाद झाला. तसेच या सामन्यासाठी विराट कोहली आणि केएल राहुल यांना विश्रांती दिली होती.
A dash of laughter does not hurt after the series win! ☺️#TeamIndia captain @ImRo45 & @DineshKarthik share a lighter moment. 👍#INDvSA pic.twitter.com/8WcTjcpOSF
— BCCI (@BCCI) October 4, 2022
या मालिकेनंतर भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. यामध्ये भारत शिखर धवन याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषक तर खेळायचाय, पण मोहम्मद शमीपुढे आहे ‘हे’ आव्हान; आता भारताचं कसं होणार?
इंदोर टी20 नंतर सोशल मीडियावर अश्विन पुन्हा एकदा चर्चेत; त्या प्रसंगामूळे होतोय ट्रोल