भारतीय संघ सध्या घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (INDvSA) तीन सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला असून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तिरूअनंतपुरम येथे झालेल्या पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे (Back stress fracture)खेळू शकला नाही. आता तो संपूर्ण मालिकेतून बाहेर झाल्याने त्याच्याजागी मोहम्मद सिराज याची संघात वर्णी लागली आहे, मात्र त्याची आंतरराष्ट्रीय टी20ची कामगिरी चकित करणारी आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित दोन टी20 सामन्यासाठी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्याजागी मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) खेळणार, हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रवारी (30 सप्टेंबर) जाहीर केले आहे. बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला आहे.
टेस्ट स्पेशालिस्ट सिराजने भारताकडून शेवटचा टी20 सामना फेब्रुवारीमध्ये खेळला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात त्याने एक विकेटही घेतली होती.
सिराजने 2017मध्ये भारताच्या टी20 सामन्यात पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात त्याला न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगलेच धुतले होते. राजकोट येथे खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात सिराजने 4 षटके टाकताना 53 धावा देत 1 विकेट घेतली होती. ही विकेट न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन (12 धावा) याची होती. हा सामना भारताने 40 धावांनी गमावला होता. त्यानंतर त्याने केवळ चार सामने खेळले आहेत.
सिराजने न्यूझीलंड विरुद्ध दोन सामन्यात दोन, श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यात दोन आणि बांगलादेश विरुद्ध एक विकेट अशाप्रकारे त्याने पाच सामन्यात केवळ पाच विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 10.45 आहे. तसेच त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना 65 सामन्यांमध्ये 8.78च्या इकॉनॉमी रेटने 59 विकेट्स घेतल्या आहेत.
Miyan returns! 🤩 @mdsirajofficial has been called up to the Indian squad for the ongoing T20I series against South Africa as Jasprit Bumrah has been ruled out with an injury.
Here’s wishing Bumrah a speedy recovery. 🙌🏻#PlayBold #TeamIndia #INDvSA pic.twitter.com/ftPuiP2ywa
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) September 30, 2022
सिराजने भारताकडून 13 कसोटी सामने खेळताना 3.31च्या इकॉनॉमी रेटने 40 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 10 वनडे सामन्यात 13 विकेट्स घेतल्या आहेत. एकंदरच तो भारतासाठी मर्यादीत षटकांच्या सामन्यात चांगली कामगिरी करू शकला नाही, मात्र त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत संघात जागा मिळाली आहे. तर त्याला अंतिम अकरामध्ये खेळवले जाईल की नाही याबाबत मात्र शंका आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! जसप्रीत बुमराहच्याजागी भारताच्या टी20 संघात ‘या’ वेगवान गोलंदाजाची एंट्री
‘हे’ तिघे भरून काढणार टी-20 विश्वचषकात बुमराहची कमी! एकाने भारतासाठी खेळलेत फक्त तीन सामने
ऑस्ट्रेलिया लिजेंड्सला धूळ चारत सचिनची इंडिया लिजेंड्स फायनलमध्ये, दोन दिवस चालला उपांत्य सामना