भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाच्या गोलंदाजांचा बोलबाला होता. चेन्नईतील मैदान हे फिरकी गोलंदाजांसाठी प्रसिद्ध आहे. परंतु पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांबरोबरच वेगवान गोलंदाजांनीही उत्तम गोलंदाजी केली. मात्र, भारतीय संघाच्या गोलंदाजांना आलेल्या अपयशामुळे भारतीय संघ १-० ने पिछाडीवर आहे. तसेच इंग्लंड संघाकडून जेम्स अँडरसन, डॉम बेस आणि जोफ्रा आर्चर यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली.
मालिकेतील दुसरा कसोटी सामनादेखील याच मैदानावर होणार आहे. अशातच भारतीय संघव्यवस्थापकांच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे. संघात कोणत्या गोलंदाजांना संधी मिळेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दुसऱ्या कसोटीत सामन्यात नाणेफेक ठरणार का निर्णायक?
येत्या १३ फेब्रुवारीपासून चेन्नईमध्येच भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. पहिला कसोटी सामना पाहता, स्पष्ट दिसून येत आहे की, या मैदानावर चौथ्या डावात फलंदाजी करणे कठीण जाते. नाणेफेक जिंकून जो संघ प्रथम फलंदाजी करेल. त्यांना सामना जिंकण्याची संधी असू शकते. परंतु हे विसरूनही नाही चालणार की, भारतीय संघानेच या मैदानावर चौथ्या डावात २००८ साली ३८७ धावांचे आव्हान पूर्ण केले होते.
भारतात ऑस्ट्रेलियन मैदानांसारखी खेळपट्टी का नाही?
प्रत्येक कसोटी सामन्याचा पाचवा दिवस हा महत्त्वाचा मानला जातो. नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी उत्कृष्ट गोलंदाजी करत इंग्लंड संघाने विजयी पताका झळकावली होती. यात वेगवान गोलंदाजांची महत्वाची भूमिका होती.
तसेच भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या शेवटच्या २ कसोटी सामन्यात, शेवटच्या दिवशी फलंदाजी करत एका सामन्यात विजय मिळवला होता. तर एक सामना अनिर्णीत राखला होता. भारतीय संघ बाऊन्स करणाऱ्या आणि स्विंग करणाऱ्या खेळपट्टीवर देखील चांगले प्रदर्शन करत आहेत, असे असताना भारतात अशी खेळपट्टी का तयार केली जात नाही, असे प्रश्न अनेकांकडून उपस्थित केले जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
पंतच्या जबरा फलंदाजीने डगमगडला इंग्लिश गोलंदाजाचा विश्वास, क्रिकेट सोडण्याचे बनवले होते मन
ब्रेकिंग! दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा, अंडरसनसह ‘हे’ खेळाडू बाहेर
‘तो महान गोलंदाज आहे आणि वयानुसार…,’ अंडरसनविषयी ट्विट करत स्टेनने संपवल तुलनेचं सत्र