---Advertisement---

ईशानच्या पदार्पणावेळी घरात होते ‘असे’ वातावरण; आई करत होती पुजा, तर वडील…

On: मंगळवार, मार्च 16, 2021 3:14 PM
---Advertisement---

अहमदाबाद येथे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेला दुसरा टी२० सामना युवा भारतीय फलंदाज ईशान किशन याच्यासाठी संस्मरणीय राहिला. या सामन्यातून ईशानने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. याबरोबरच, पदार्पणाच्या सामन्यात दमदार अर्धशतक झळकावून त्याने सर्वांची वाहवा मिळवली. मात्र, यावेळी त्याच्या घरातील वातावरण कसे होते, याचा खुलासा त्याच्या कुटुंबीयांनी व प्रशिक्षकांनी केला आहे.

घरात होते असे वातावरण ईशाननेआपला पदार्पणाचा सामना खेळला त्यावेळी त्याच्या घरात कसे वातावरण होते, याचा खुलासा त्याचे आई वडील व प्रशिक्षक यांनी एका मुलाखतीत केला. ईशानची आई सुचित्रा सिंग म्हणाल्या, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील माझ्या मुलाच्या पदार्पणामुळे मी किती आनंदी आहे हे मी शब्दांत वर्णन करू शकत नाही. जेव्हा तो फलंदाजीला गेला, तेव्हा मी घरी बजरंग बलीची पूजा करण्यास सुरवात केली. त्यांच्या कृपेनेच माझा मुलगा चांगली फलंदाजी करू शकला. देव त्याला शक्ती देवो. ईशानने चांगली कामगिरी केली याचा मला अभिमान आहे.”

ईशानचे वडील आपली स्थिती सांगताना म्हटले, “जेव्हा ईशान पहिल्यांदा क्रीजवर गेला असता, तेव्हा त्याची स्थिती काय होती हे मला ठाऊक नाही. परंतु, मी खूप चिंताग्रस्त होतो. मी विचार करत होतो की तो कशा प्रकारे फलंदाजी करेल. धावा होतील की नाही. मात्र, त्याने पहिल्या सामन्यातच शानदार फलंदाजी केली आणि अर्धशतक केले. मी खूप आनंदी आहे आणि आशा आहे की तोही पुढेही अशाच प्रकारे खेळेल.”

ईशानचे प्रशिक्षक उत्तम मुजुमदार यांनी सांगितले, “ईशानने स्वतःला सिद्ध केले आहे. वयाच्या पाचव्या वर्षी मी त्याला सर्वप्रथम पाहिले होते. तो एक उत्तम फलंदाज असून, मला आशा आहे की तो आगामी टी२० विश्वचषकात खेळेल.”

ईशानने आपल्या पहिल्या सामन्यात मिळालेला सामनावीर पुरस्कार उत्तम मुजुमदार यांचे वडील बिमलक्रांती मुजुमदार यांना अर्पण केला होता. लहानपणापासून ईशानचे ते लाड करत. ४ मार्च रोजी त्यांचे आकस्मित निधन झाले होते.

पदार्पणात दमदार अर्धशतक
ईशानने काल (१४ मार्च) इंग्लंडविरुद्ध भारतासाठी पहिला टी२० सामना खेळला. तो भारताकडून टी२० क्रिकेट खेळणारा ८४ वा खेळाडू बनला. सलामीवीर म्हणून खेळताना ईशानने अवघ्या ३२ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने आक्रमक ५६ धावा ठोकल्या. त्याने पदार्पणातच सामनावीर पुरस्कार मिळवला. त्याच्या या खेळीनंतर सर्वांनी त्याचे कौतुक केले.

महत्त्वाच्या बातम्या – 

मै तेरा, मै तेरा..! लग्नानंतर बुमराह-संजनाचा जुना व्हिडिओ व्हायरल, लाजताना दिसतोय जस्सी

INDvENG: टी२० क्रिकेटमधील ‘या’ विक्रमांत आगेकूच करण्यासाठी विराट-रोहितमध्ये चढाओढ

भारताविरुद्ध तिसऱ्या सामन्यात इंग्लंडचा ‘हा’ खेळाडू करणार ‘धडाकेबाज’ विक्रम, रोहितची करणार बरोबरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---