लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर रविवारी (29 ऑक्टोबर) गोलंदाजांनी कहर केला. फलंदाजांसाठी या स्टेडियमवर खेळणे कठीण होऊन बसले होते. भारत आणि इंग्लंड यांच्यात हा सामना खेळला गेला. कुलदीप यादव याने टाकेलल्या एका अप्रतिम चेंडूवर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने विकेट गमावली. या चेंडूसाठी हा सामना कुलदीपचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भारतीय संघ या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांमध्ये 9 विकेट्सच्या नुकसानावर 229 धावा करू शकला. कर्णधार रोहित शर्मा याने सर्वाधिक 87 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने पावरप्लेच्या 10 षटकांमध्ये सुरुवातीच्या चार विकेट्स गमावल्या. कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) याच्या रुपात इंग्लंडला पाचवा झटका बसला. कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याने डावातील 16व्या षटकात बटलरचा त्रिफळा उढवला. 23 चेंडूत वैयक्तिक 10 धावा करून त्याने विकेट गमावली. कुलदीपच्या या चेंडूचा उल्लेख अनेकांनी विश्वचषकातील सर्वोत्तम चेंडू असाही केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/reel/Cy_J9PPP0Oz/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
This is a Jaffa from Kuldeep Yadav.
Just an incredible delivery! pic.twitter.com/6xDGV5lyeL
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 29, 2023
कुलदीप यादव ने मैजिकल गेंद पर बटलर को बोल्ड किया है। यह इस साल की सबसे बेहतरीन गेंद हो सकती है।#INDvsENG pic.twitter.com/NzcTLpPHwU
— Parmindar Ambar (@ParmindarAmbar) October 29, 2023
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
इंग्लंड – जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (यष्टीरक्षक/कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वूड
महत्वाच्या बातम्या –
WORLD CUP 2023 । टॉप 4 नाही, टॉप 7 साठी स्पर्धा; चॅम्पियन्स ट्रॉफीमुळे वाढली या संघांची डोकेदुखी
शतक हुकलं पण तरीही रेकॉर्ड बुकमध्ये राहिला रोहित! वाचा इंग्लंडविरुद्ध केलेले पाच पराक्रम