न्यूझीलंडविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात भारतासाठी विराट कोहली पुन्हा एकदा मॅच विनर ठरला. विराटने या सामन्यात सर्वाधिक 95 धावांची खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. भारताने हा सामना 4 विकेट्सने जिंकला. सलामीवीर रोहितनेही महत्वपूर्ण खेळी केली. पण अर्धशतकाआधीच कर्णधार बाद झाला. सूर्यकुमार यादव याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, त्याने अवघ्या 2 धावा करून विकेट गमावली.
वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) मधील पहिल्या चार सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. रविवारी (22 ऑक्टोबर) न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याच्या जागी त्याला संघात संधी दिली गेली. मात्र, सूर्यकुमार या संधीचा फायदा घेऊ शकला नाही. 4 चेंडूत 2 धावा करून त्याने विकेट गमावली. नॉन स्ट्राईकवर असलेल्या विराट कोहली याच्यासोबत ताळमेळ बिघडल्यामुळे सूर्यकुमार धावबाद झाला. डावातील 36व्या षटकात सूर्यकुमार बाद झाला, तेव्हा भारताची धावसंख्या 191 होती. सूर्यकुमारच्या रुपात संघाला पाचवा झटका बसला.
https://www.instagram.com/reel/CytN-XnvB_5/?utm_source=ig_web_copy_link
भारताला या सामन्यात विजयासाठी 274 धावांचे लक्ष्य मिळाले होते. संघाने हे लक्ष्य 48 षटकांमध्ये 6 विकेट्सच्या नुकसानावर गाढले. रोहित शर्मा 40 चेंडूत 46 धावा करून बाद झाला. सलामीवीर शुबमन गिल 26, तर श्रेयस अय्यर 33 धावांचे योगदान देऊ शकला. केएल राहुल देखील 27 धावा करून बाद झाला. सूर्यकुमारने चाहत्यांची चांगलीच निराशा केली. पण शेवटच्या षटकांमध्ये रविंद्र जडेजा विराटसोबत खेळपट्टीवर टिकून राहिला आणि संघाला विजय मिळवून दिला.
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
न्यूझीलंड- डेवॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिशेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
महत्वाच्या बातम्या –
आयसीसी स्पर्धेत ‘ही’ उंची गाठणं येड्या गबाळ्यांच काम नाही, सचिन-गेलला न जमलेली कामगिरी विराटने केली
प्रिन्स ऑन टॉप! एकाच वेळी चार मातब्बरांना मागे सोडत केला नवा विक्रम