भारताला क्रिकेटवेड्या लोकांचा देश म्हटले जाते. येथे क्रिकेट चाहते कधी एखाद्या क्रिकेटपटूला खूपच डोक्यावर घेतात. हेच त्याच्या एका वाईट प्रदर्शनानंतर त्याला थेट जमिनीवरही आटोपतात. त्यातही भारत आणि पाकिस्तान संघातील सामना असेल तर त्यांच्यासाठी हा थेट भावनेचा खेळ असतो.
रविवारी (28 ऑगस्ट) दुबईच्या मैदानावर भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघात आशिया चषक 2022 मधील (Asia Cup 2022) दुसरा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीतही चांगले प्रदर्शन करत 5 विकेट्सने विजयश्री प्राप्त केला. भारतीय संघाच्या या धडाकेबाज विजयाचा जल्लोष भारतभर साजरा (India’s Win Celebration) करण्यात आला. अगदी पुणेकरही यात मागे पडले नाहीत.
भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामना रविवारी रात्री 7.30 ते 11.50 च्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ 19.5 षटकात 147 धावांवरच गुंडाळला गेला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 2 चेंडू शिल्लक असताना पाकिस्तानचे आव्हान पूर्ण केले. जवळपास 11.50 ला हा सामना संपला.
यानंतर पुणे शहरात क्रिकेट चाहत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने भारताच्या विजयाचा जल्लोष साजरा केला. पुणे शहरातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेज रोडवर अर्थातच एफसी रोडवर (FC Road) तर भव्य रॅली काढण्यात आली. भारताचे झेंडे हाती घेऊन हजारोंच्या संख्येत लोकांनी बाईकवर फिरत ही रॅली काढली. काही जण पुंगी वाजवत फिरताना दिसले. अशाप्रकारे पुण्यातील एफसी रोडवरून मोठी रॅली काढत भारताच्या विजयाचा जल्लोष साजरा केला गेला.
https://www.instagram.com/reel/Ch0Eq1yAPmS/?utm_source=ig_web_copy_link
तर बिबडेवाडी परिसरातही जोरदार जल्लोष केला गेला. बिबवेवाडीत मोठ्या स्क्रिनवर भारत-पाकिस्तान सामना लाईव्ह पाहण्याची व्यवस्था केली गेली होती. तसेच सामना जिंकल्यानंतर फटाके फोडून सेलिब्रेशन करण्यात आले.
दरम्यान पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकत भारतीय संघ अ गटाच्या गुणतालिकेत अव्वलस्थानी गेला आहे. आता भारताचा दुसरा व शेवटचा साखळी फेरी सामना 31 ऑगस्टला दुबईतच खेळला जाईल. त्यानंतर सुपर-4 फेरी होईल.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
असे काय झाले की, हार्दिकने लाईव्ह सामन्यात पकडला रिझवानचा गळा! INDvsPAK मॅचमधील व्हिडिओ व्हायरल
भर सामन्यात पाकिस्तानची जर्सी घालून आला विराटचा जबरा फॅन! आता सोशल मीडियावर घालतोय राडा
तिकडे पाकिस्तान हारत होता, इकडे आझम फक्त रडायचा बाकी होता! ‘तो’ व्हिडिओ व्हायरल





