यंदाच्या आयसीसी महिला टी20 विश्वचषकात आज पासून भारतीय संघाच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिली लढत न्यूझीलंड विरुद्ध असेल. जो की हा सामना आज 04ऑक्टोबर खेळवला जाईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला टी-20 विश्वचषकाची सुरुवात विजयाने करायची आहे. या दोघांमधील हा सामना दुबईतील दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना हा या स्पर्धेतील चौथा सामना असेल. टीम इंडियासोबतच न्यूझीलंडचाही हा स्पर्धेतील पहिला सामना असेल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सामना सुरू होईल. या सामन्यातील विजयासह टीम इंडिया या स्पर्धेसाठी पूर्णपणे तयार असल्याचे उत्तर देऊ शकेल. तर य बातमीद्वारे जाणून घ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील रंजक सामना तुम्ही कधी, कुठे आणि कसा लाइव्ह पाहू शकाल.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील महिला टी20 विश्वचषक 2024 सामना शुक्रवार, 04 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. दोघांमधील हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारतीय चाहत्यांना संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून सामना थेट पाहता येणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड महिला संघांमधील सामना स्टार स्पोर्ट्सच्या माध्यमातून टीव्हीवर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. हॉटस्टारवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
महिला टी20 विश्वचषकासाठी टीम इंडिया
शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, अरुंधती रेड्डी, राधा यादव, रेणुका ठाकूर सिंग, दयालन हेमलता, एस सज्जना, एस. शोभना.
महिला टी20 विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघ
सुझी बेट्स, अमेलिया केर, सोफी डेव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गझ (यष्टीरक्षक), हन्ना रो, रोझमेरी मायर, ईडन कार्सन, फ्रॅन जोनास, ली ताहुहू, लेह कॅस्परेक, जेस केर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर
हेही वाचा-
मॅच जिंकताच संपूर्ण संघ भावूक; बांग्लादेशला दशकानंतर महिला टी20 विश्वचषकात विजय मिळाला
पाकिस्तानचा दणदणीत विजय; श्रीलंकेचा दारुण पराभव, भारतासाठी धोक्याची घंटा
इराणी चषकातील द्विशतकानंतर सरफराज खानची सूचक पोस्ट, कोणावर साधला निशाणा?