रविवार (१ मे) डबल हेडरचा पहिला सामना पहिला सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. हा सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला गेला असून लखनऊने ६ धावांनी विजय मिळवला. लखनऊला मिळालेल्या विजयात त्यांचा युवा वेगवान गोलंदाज मोहसिन खानचे योगदान महत्वाचे ठरले. सामन्यात मोहसिनने केलेल्या प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर देखील निवडले गेले.
अवघ्या २३ वर्षांच्या मोहसिन खान (Mohsin Khan) याने एखाद्या अनुभवी वेगवान गोलंदाजाला लाजवेल असे प्रदर्शन करून दाखवले. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या या सामन्यात त्याने चार षटके गोलंदाजी केली. या षटकांमध्ये मोहसिनने १६ धावा खर्च केल्या आणि ४ विकेट्स नावावर केल्या. त्याच्या भेदक माऱ्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला मर्यादित २० षटकांमध्ये मिळालेले लक्ष्य गाठता आले नाही. मोहसिन मुळचा उत्तर प्रदेशच्या संभलचा राहणारा आहे. लखनऊचे प्रतिनिधित्व करण्यापूर्वी तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात देखील सहभागी होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये लखनऊ सुपर जायंट्सने मोहसिनला गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा संधी दिली होती. मोहसिनसाठी हा त्याचा पदार्पण सामना होता. त्या सामन्यात त्याने फक्त दोन षटके टाकली आणि १८ धावा खर्च करून एकही विकेट घेतली नव्हती. त्यानंतर पुढचे बरेच दिवस लखनऊच्या संघ व्यवस्थापनाने त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले. जवळपास एक महिन्यानंतर त्याला दुसरी संधी मिळाली. यावेळी लखनऊसोमर मुंबई इंडियन्सचे आव्हान होते. मुंबईविरुद्ध मोहसिनने अवघ्या एका षटकात २७ धावा खर्च केल्या आणि एकही विकेट घेतली नाही.
मुंबईविरुद्ध जरी मोहसिन संघाला महागात पडला असला, तरी लखनऊच्या संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि पुढच्या सामन्यात देखील संधी दिली. यावेळी लखनऊसमोर पंजाब किंग्जचे आव्हान होते. यावेळी मात्र मोहसिन खानने तीन षटके गोलंदाजी केली आणि २४ धावा खर्च करून ३ महत्वाच्या विकेट्स घेतल्या. या जबरदस्त प्रदर्शनानंतर लखनऊ सुपर जायंट्सने रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्द त्याला पुन्हा संधी दिली. रविवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात मोहसिनने टाकलेल्या चार षटकात अवघ्या १६ धावा खर्च करून ४ महत्वाच्या विकेट्स घेतल्या आणि संघाला विजय मिळवण्यासाठी महत्वाचे योगदान दिले.
मुंबई इंडियन्सने २०२० मध्ये मोहसिनला त्याची मूळ किंमत २० लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते. मुंबईने त्याच्यासाठी आयपीएलचे दरवाजे तर खोलले, पण त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. संपूर्ण हंगामात मोहसिनने मुंबईसाठी नेट गोलंदाजाच्या रूपात काम करत राहिला. त्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्सने देखील त्याला मूळ किंमतीत खरेदी केले आहे, पण यावेळी पदार्पणाची संधी मिळाली. मोहसिनने देखील मिळालेल्या या संधीचे सोने केले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करताना त्याने एका रणजी सामन्यात दोन, १७ अ दर्जाच्या सामन्यांमध्ये २६, तर ३० टी२० सामन्यांमध्ये ४१ विकेट्स घेतल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लतितने रोखले राहुलचे तिसरे शतक; स्पायडरमॅन बनून यादवने घेतला शानदार झेल
४८वी कुमार-कुमारी राज्य कबड्डी अजिंक्यपद निवड चाचणी या दिवसापासून पुण्यात होणार