---Advertisement---

वाढदिवस विशेष : आपल्या अचाट वेगाने प्रतिस्पर्धी फलंदाजांना धडकी भरवणारा शेन बॉन्ड

On: मंगळवार, जून 7, 2022 2:37 PM
---Advertisement---

क्रिकेट विश्वात २०००च्या दशकाच्या सुरुवातीला अनेक वेगवान गोलंदाजांचा उदय होऊ लागला होता. शोएब अख्तर, ब्रेट ली, शॉन टेट, मोहम्मद सामी असे वेगासाठी प्रसिद्ध असलेले वेगवान गोलंदाज त्यावेळी क्रिकेट विश्वात आपला ठसा उमटवत होते. त्यांच्याच बरोबर त्यावेळी अशाच अजून एका घातक वेगवान गोलंदाजाचा उदय होत होता. तो गोलंदाज म्हणजे न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज शेन बॉन्ड.

शेन बॉन्डचा वेग ब्रेट ली, शोएब अख्तर एवढाच भयानक होता. त्यावेळी त्याची कारकीर्द देखील तितकीच शानदार असेल, अशी अटकळ बांधल्या जात होती. मात्र दुखापतींमुळे त्याची कारकीर्द म्हणावी तितकी यशस्वी झाली नाही. आज त्याचा ४२वा वाढदिवस आहे. त्याच निमित्ताने या हरहुन्नरी किवी गोलंदाजाच्या कामगिरीबाबत आपण अधिक जाणून घेऊया.

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर केले पदार्पण
न्यूझीलंड संघाने २००१-०२ साली केलेल्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर शेन बॉन्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी शेन बॉन्डच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात झाली होती. त्याच्या आगमनाने न्यूझीलंडकडे खऱ्या अर्थाने एका वेगवान गोलंदाजाचा पर्याय उपलब्ध झाला होता. मात्र पुढे बॉन्डला कारकिर्दीत सातत्याने दुखापतींचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याची कारकीर्द कधीच फारशी बहरली नाही. आठ वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत त्याला केवळ १८ कसोटी सामने खेळता आले.

शेन बॉन्डची कारकीर्द
शेन बॉन्डने आपल्या कारकिर्दीत १८ कसोटी सामन्यात ८७ बळी घेतले. ५१ धावांत ६ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. वनडे कारकिर्दीत त्याने एकूण ८२ आंतरराष्ट्रीय सामने खेळतांना १४७ बळी घेतले. यात १९ धावा देऊन ६ बळी हे त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन ठरले. याशिवाय २० टी२० सामन्यांत त्याने २५ बळी घेतले आहेत.

बॉन्डचे पहिले तीन कसोटी बळी हे स्टीव्ह वॉ, मॅथ्यू हेडन आणि जस्टिन लॅंगर हे होते. विशेष म्हणजे हे तिघेही खातेही न उघडता बाद झाले होते. याशिवाय बॉन्डच्या नावे एक हॅट्ट्रिक देखील आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने २००७ साली एका वनडे सामन्यात ही किमया केली होती. त्यावेळी त्याने अँड्रयू सायमंड्स, कॅमरुन व्हाइट आणि नॅथन ब्रॅकन यांना बाद केले होते.

आयपीएलचा देखील होता भाग
शेन बॉन्ड काही काळ इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल मध्ये देखील खेळला. यात तो कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाकडून खेळला होता. निवृत्तीनंतर तो आता मुंबई इंडियन्स संघासाठी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून देखील काम पाहतो आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रिषभ पंत यष्टीरक्षक फलंदाज बनण्यामागे ‘या’ व्यक्तीचा हात, दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी स्वत:च केला खुलासा

काय सांगता! धनश्री नाहीये चहलचं पहिलं प्रेम, खुद्द तिनेच केलाय खुलासा

‘विश्वचषक खेळायचा असेल, तर त्याने वनडे क्रिकेट खेळण्याचा धोका पत्करू नये’, ‘या’ खेळाडूला शास्त्रींचा सल्ला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---