Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आंतरशालेय हॉकी: सेंट जोसेफ प्रशालेचा दणदणीत विजय

आंतरशालेय हॉकी: सेंट जोसेफ प्रशालेचा दणदणीत विजय

November 20, 2022
in टॉप बातम्या, हॉकी
File Photo

File Photo


पुणे येथे सुरु असलेल्या दुसऱ्या फादर शॉक स्मृती आंतरशालेय हॉकी स्पर्धेत शनिवारी सेंट जोसेफ मुलांच्या प्रशाला संघाने दणदणीत विजयाची नोंद केली. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात १४ वर्षांखालील गटात सेंट जोसेफ प्रशाला संघाने दिल्ली पब्लिक स्कूल, उंड्री संघाचा ४-० असा पराभव केला.

ब गटातील या सामन्यात अथर्व गोपाळने ७व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर १४ आणि १८व्या अशा चार मिनिटाला निलकांतने दोन गोल करून संघाची आघाडी वाढवली. ओम मोरे ४८व्या मिनिटाला आणखी एक गोल करून संघाच्या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

स्पर्धेतील १७ वर्षांखालील गटात झालेल्या सामन्यात मॉडर्न प्रशाला, शिवाजीनगर संघाने एका गोलच्या पिछाडीनंतर सेंट पॅट्रिक प्रशालेचा २-१ असा पराभव केला. सेंट पॅट्रिक प्रशाला संघाच्या श्रावण लटदातने चौथ्या मिनिटाला गोल करून संघाचे खाते उघडले.

त्यानंतर मध्यंतरापर्यंत त्यांनी आघाडी कायम राखली होती. मात्र, उत्तरार्धात संचित मुसलरेने ३९ आणि ४२व्या मिनिटाला गोल करून संघाचा विजय निश्चित केला.

निकाल-
१४ वर्षांखालील: ब गट पीसीएमसी ४ (कृष्णा गोटे ७वे, कुणाल लांडगे ३६वे, सोहेल पटाण ४८वे, स्वराज मासुगडे ५७वे मिनिट) वि. वि. दिल्ली पब्लिक स्कूल, उंड्री ० मध्यंतर १-०

सेंट पॅट्रिक प्रशाला १ (शौर्य मेंगे ५८वे मिनिट) वि.वि. पीसीएमसी ० मध्यंतर ०-०

सेंट जोसेफ बॉईज प्रशाला ४ (अथर्व गोयल ७वे, निलकांत ढवळे १४, १८वे मिनिट, ओम मोरे ४९वे मिनिट) वि.वि. दिल्ली पब्लिक स्कूल, उंड्री ० मध्यंतर ३-०

१७ वर्षांखालील: ड गट – मॉडर्न प्रशाला, शिवाजीनगर २ (संचित मुसालरे ३९, ४२वे मिनिट) वि.वि. सेंट पॅट्रिक प्रशाला १ (श्रावण लटदाते ४थे मिनिट) मध्यंतर ०-१

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हैदराबाद एफसीची अपराजित मालिका खंडित; केरला बास्टर्सने दिला पराभवाचा धक्का
नसीम शाहच्या पावलांवर लहान भावाचे पाऊल! टाकला असा चेंडू की फलंदाजही पडला गोंधळात, मिळाली पहिली विकेट


Next Post
Photo Courtesy: Instagram/babitaphogatofficial

वाढदिवस विशेष: भारताची स्टार कुस्तीपटू बबीता फोगटबद्दल खास 5 गोष्टी घ्या जाणून

Sunil-Shetty-KL-Rahul-Athiya-Shetty

ठरलं एकदाचं! खुद्द वडिल सुनील शेट्टीने केले केएल राहुल-आथिया शेट्टीच्या लग्नाबाबत मोठे वक्तव्य

Photo Courtesy: Twitter/ICC

जशास तसे! असे 3 प्रसंग, जेव्हा भारतीय खेळाडूंनी विरोधी संघाच्या स्लेजिंगला दिलंय खणखणीत प्रत्युत्तर

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143