---Advertisement---

राजकोट कसोटीत पृथ्वी शॉच्या बाबतीत घडला हा खास योगायोग!

On: गुरूवार, ऑक्टोबर 4, 2018 1:34 PM
---Advertisement---

राजकोट। आजपासून भारत विरुद्ध विंडिज संघात पहिला कसोटी सामना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयमवर सुरु झाला आहे. या सामन्यात भारताकडून 18 वर्षीय पृथ्वी शॉने त्याच्या पहिल्याच सामन्यात शतक केले आहे.

शॉने सलामीला येत 99 चेंडूत त्याचे शतक साजरे केले. याबरोबरच तो पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक करणारा जगातील 106वा तर भारताचा 15 वा क्रिकेटपटू ठरला आहे.

विशेष म्हणजे त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पदार्पणही 2017 मध्ये राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयमवरच केले होते. तसेच या सामन्यातही त्याने शतक झळकावले होते.

हा सामना मुंबई विरुद्ध तमिळनाडू यांच्यातील रणजी ट्रॉफी 2016-17 च्या मोसमतील उपांत्य फेरीचा सामना होता. शॉने या सामन्यात दुसऱ्या डावात 175 चेंडूत 120 धावांची शतकी खेळी केली होती. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 1 षटकार मारला होता. तसेच त्याला या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता.

याबरोबरच शॉ हा दुलिप ट्राॅफी, रणजी ट्राॅफी आणि कसोटी पदार्पणात शतक करणारा भारतातील पहिलाच क्रिकेटपटू आहे.

भारताने विंडिज विरुद्धच्या या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पण भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलने पहिल्याच षटकात विकेट गमावली होती. त्याला शून्य धावेवर असतानाच शॅनन गॅब्रियलने पायचीत बाद केले.

मात्र त्यानंतर शॉ आणि चेतेश्वर पुजाराने भारताचा डाव सांभाळत भारताला दुसऱ्या सत्रातच 200 धावांचा टप्पा पार करुन दिला आहे. पुजारानेही त्याचे 19 वे अर्धशतक साजरे केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment