वनडे विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तान संघाने अत्यंत खराब कामगिरी केल्याचे दिसून येत आहे. पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवून शानदार सुरुवात केल्यानंतर त्यांना सलग चार सामन्यात पराभूत व्हावे लागले. त्यामुळे आता उपांत्य फेरीच्या त्यांच्या आशा अगदी अंधुक झाल्या आहेत. पाकिस्तान संघावर यामुळे टीका होत असताना, आता पाकिस्तान क्रिकेट संघाच्या निवड समितीचे प्रमुख इंझमाम उल हक यांनी राजीनामा दिला आहे.
Inzamam Ul Haq has resigned as PCB Chief Selector. pic.twitter.com/c2lqfEMumF
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 30, 2023
या विश्वचषकात सहभागी होत असताना पाकिस्तान संघाला विजेतेपदाचा दावेदार म्हटले जात होते. पहिल्या सामन्यात नेदरलँड आणि त्यानंतर श्रीलंकेला पराभूत करत त्यांनी दमदार सुरुवात केली. मात्र, त्यानंतर सलग चार सामने त्यांना पराभूत व्हावे लागले. भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान व दक्षिण आफ्रिका यांच्याकडून त्यांना सलग चार सामने गमवावे लागले. त्यामुळे आता उर्वरित तीन सामन्यात विजय मिळवूनही इतर संघांच्या कामगिरीवर त्यांना उपांत्य फेरीचे तिकीट मिळू शकते.
संघाच्या याच खराब कामगिरीची जबाबदारी घेत निवड समिती अध्यक्ष इंझमाम उल हक यांनी राजीनामा दिला. या विश्वचषकासाठी त्यांच्याच नेतृत्वात संघाची घोषणा केली गेली होती. या संघात बाबर आझम व इंझमाम यांच्या जवळच्या खेळाडूंना अधिक संधी मिळते असा आरोप अनेकदा केला जातो.
(Inzamam Ul Haq Resign As PCB Selection Committee Chairman)
महत्वाच्या बातम्या –
मैं हू ना! कुलदीपने चाहत्यांना सांगून उडवलेल्या बटलरच्या दांड्या
महाराष्ट्र U19 संघ बनला विनू मंकड ट्रॉफीचा चॅम्पियन! अर्शिन कुलकर्णीचे शानदार शतक, मुंबई पराभूत