---Advertisement---

गावसकरांचा ‘तो’ सल्ला पाकिस्तानच्या ‘या’ दिग्गजासाठी ठरला मौल्यवान

On: बुधवार, जुलै 15, 2020 12:26 PM
---Advertisement---

पाकिस्तानचे माजी कर्णधार इंझमाम उल हकने भारतीय संघाचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकरांची प्रशंसा केली आहे. ते म्हणाले, एकदा त्याला शॉर्ट चेंडूने पुरते चिंतेत टाकले होते. परंतु गावसकरांनी दिलेला सल्ल्याने त्यांची समस्या कायमची दूर झाली. यासाठी त्यांनी गावसकरांकडे मदत मागितली होती, असेही सांगितले.

आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना इंझमाम (Inzamam Ul Haq) म्हणाले, “मी १९९२ च्या विश्वचषकानंतर इंग्लंड दौऱ्यावर गेलो होतो. विश्वचषकात मी उत्तम कामगिरी केली होती आणि तो माझा इंग्लंडचा पहिला दौरा होता. त्या खेळपट्ट्यांवर कसे खेळायचे हे मला माहीत नव्हते. त्यावेळी मी खराब फॉर्ममध्येही होतो आणि शॉर्ट चेंडूवर मला खेळणे खूप कठीण जात होते.”

“अर्ध्या मोसमानंतर एका चॅरिटी सामन्यादरम्यान माझी गावसकरांशी (Sunil Gavaskar) भेट झाली. आम्ही दोघेही चॅरिटी सामना खेळायला गेलो होतो. मी त्यांना म्हणालो, सुनील भाई मला शॉर्ट चेंडूवर खेळणे कठीण जात आहे. मी काय करू? त्यावर त्यांनी मला खूप महत्त्वाचा सल्ला दिला. गावसकर मला म्हणाले, ‘जेव्हा गोलंदाज गोलंदाजीसाठी येईल, तेव्हा शॉर्ट चेंडूंबद्दल विचार करू नको. जर असे केले तर तुला पुन्हा समस्या निर्माण येईल,” असेही गावसकरांनी दिलेल्या सल्ल्याबद्दल इंझमाम म्हणाले.

“गावसकरांनी दिलेला सल्ला ऐकून मी त्याचप्रकारे सराव केला. मी शॉर्ट चेंडूंबद्दल विचार करणे बंद केले होते. त्यामुळे माझी ही कमजोरी दूर झाली. १९९२ पासून मी निवृत्त होईपर्यंत मला शॉर्ट चेंडूचा त्रास कधीही झाला नाही,” असेही इंझमाम पुढे म्हणाले

इंझमामने पाकिस्तानकडून १२० कसोटी सामने आणि ३७८ वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ८८३० धावा केल्या आहेत, तर वनडेत त्याने ११७३९ धावा केल्या आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी-

-एमएस धोनीच्या शिफारशीमुळे ‘हा’ खेळाडू झाला मालामाल

-असे ३ भारतीय फलंदाज जे भविष्यात करु शकतात रोहित शर्माप्रमाणे फलंदाजी

-खुशखबर! इंग्लंडनंतर आता या देशात होणार क्रिकेटचे पुनरागमन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---