भारतीय क्रिकेट संघाकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तान आणि हाँगकाँग हे संघ शुक्रवारी (02 सप्टेंबर) एकमेकांशी भिडणार आहेत. उभय संघातील हा सामना शारजाहच्या शारजाह क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. आशिया चषक 2022 मधील हा शेवटचा साखळी फेरी सामना असून या सामन्याच्या निकालानंतर सुपर-4 फेरीचे चित्र स्पष्ट होईल. हा सामना जिंकणारा संघ सुपर-4 फेरीसाठी पात्रता मिळवणारा चौथा संघ बनेल. तर पराभूत होणारा संघ थेट स्पर्धेतून बाहेर होईल.
या सामन्यात पाकिस्तान संघाचे पारडे जड आहे. परंतु हाँगकाँग संघाने मागील सामन्यात भारताला चांगलीच टक्कर दिली होती. त्यांचे गोलंदाजी आणि फलंदाजी, दोन्हीतील प्रदर्शन प्रशंसनीय राहिले होते. त्यामुळे हाँगकाँग संघाला हलक्यात घेणे मोठी चूक ठरू शकते. हीच बाब लक्षात घेता पाकिस्तानचे माजी कर्णधार इंझमाम-उल-हक (Inzamam-Ul-Haq) यांनी संघाला सावध केले आहे.
पाकिस्तानच्या माजी कर्णधारांनी (Inzamam-Ul-Haq Warns Pakistan) म्हटले आहे की, “हाँगकाँगला अजिबात हलक्यात घेऊ नका. पूर्ण तयारीनिशी मैदानावर उतरा.”
याबरोबरच इंझमाम यांनी हाँगकाँगला कोणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली याबद्दल बोलताना म्हटले आहे की, “हाँगकाँगविरुद्ध खुशदील शाह आणि आसिफ अली यांना जागा दिली पाहिजे. मधल्या फळीत अनुभवाची कमी दिसत आहे. जर पाकिस्तान संघाने शोएब मलिकला संघात निवडले असते तर, मधली फळी आणखी मजबूत बनली असती.”
दरम्यान पाकिस्तान संघाला अद्याप आशिया चषकात विजयश्री प्राप्त करता आलेली नाही. त्यांचा पहिला सामना कट्टर प्रतिद्वंद्वी भारताविरुद्ध झाला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 विकेट्सने पराभूत केले होते. या सामन्यात पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करताना 19.5 षटकात 147 धावांवरच गुंडाळला गेला होता. प्रत्युत्तरात भारताने 19.4 षटकात 5 विकेट्स गमावत पाकिस्तानचे आव्हान पूर्ण केले होते.
या पराभवानंतर आता सुपर-4 फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तानकडे शेवटची संधी आहे. जर पाकिस्तानचा संघ हाँगकाँगविरुद्ध पराभूत झाला, तर त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
केएल राहुलला हटवून ‘या’ खेळाडूंना केले जाऊ शकते उपकर्णधार, टी20 संघातूनही होणार बाहेर?
‘संघात निवड झाली अन् वडिलांच्या कबरीवर पोहोचला’, पाकिस्तानी खेळाडूने केलं भावूक कृत्य
बांगलादेशला सळो की पळो करणाऱ्या कुसल मेंडिसचा खास ‘ऍक्शन प्लॅन’! स्वत: केलायं खुलासा