रावळपिंडी। पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर तीन सामन्यांची कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला. हा सामना अखेरच्या दिवसापर्यंत चालला मात्र, निकाल अनिर्णित राहिला. असे असले तरी, पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हक आणि अब्दुल्ला शफिक या पाकिस्तानच्या सलामीवीरांनी मोठे विक्रम केले आहेत.
या सामन्याच्या दुसऱ्या डावात पाकिस्तानकडून अब्दुल्ला शफिक (Abdullah Shafique) आणि इमाम-उल-हक दोघेही शेवटच्या दिवसाच्या अखेरपर्यंत नाबाद राहिले. या दोघांनीही आपली विकेट न गमावता शतकेही साजरी केली. शफिक आणि इमाम यांनी दुसऱ्या डावात तब्बल नाबाद २५२ धावांची भागीदारी रचली. शफिकने २४२ चेंडूत १३६ धावांची खेळी केली. तसेच इमामने नाबाद १११ धावांची खेळी केली.
त्यामुळे शफिक आणि इमाम यांची दुसरीच सलामीवीरांची जोडी ठरली, ज्यांनी एका कसोटी डावात नाबाद शतके ठोकली आहेत. याआधी ३८ वर्षांपूर्वी १९८४ साली वेस्ट इंडिजचे गोर्डन ग्रिनिज आणि डेसमंड हाईन्स या सलामीवीरांच्या जोडीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जॉर्जटाउन येथे नाबाद शतके ठोकली होती. ग्रिनिज यांनी नाबाद १२० आणि हाईन्स यांनी नाबाद १०३ धावांची खेळी केली होती.
इमामचा मोठा विक्रम
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इंजमाम-उल-हक यांचा पुतण्या असलेल्या इमाम उल हकने या सामन्यात पहिल्या डावात देखील शतकी खेळी केली होती. त्याने १५७ धावांची खेळी केली होती. त्यामुळे त्याच्या दोन्ही डावांत मिळून २६८ धावा झाल्या आहेत. त्यामुळे त्याने एका मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली आहे.
तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध एका कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा पाकिस्तानी खेळाडू ठरला आहे. त्याने २०१४ साली युनूस खानने केलेला विक्रम मोडला आहे. युनूस खानने अबुधाबीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटीत २५९ धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून ऑस्ट्रेलिया विरुद्ध एका कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सलीम मलिक यांच्या नावावर आहे. त्यांनी रावळपिंडी येथे १९९४ साली झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध २७० धावा केल्या होत्या (unbeaten hundreds in a Test innings).
पाकिस्तानकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू
२७० – सलीम मलिक, १९९४, रावळपिंडी
२७८ – इमाम उल हक, २०२२, रावळपिंडी
२५९ – युनूस खान, २०१४, अबुधाबी
२४८ – अझर अली, २०१६, मेलबर्न
२१८ – सलीम मलिक, १९९४, लाहोर
२११ – जावेद मियाँदाद, १९८८, कराची
All over!
The two teams shake hands as the first #PAKvAUS Test in Rawalpindi ends in a draw 🤝#WTC23 | https://t.co/Ys6nq6wirm pic.twitter.com/Xtwp7uZfey
— ICC (@ICC) March 8, 2022
पहिला कसोटी अनिर्णित
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघात (Pakistan vs Australia) ४ ते ८ मार्च दरम्यान पहिला कसोटी सामना (1st Test) पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ४७६ धावांचा डोंगर उभा केला होता. पाकिस्तानकडून इमाम-उल-हक (Imam-Ul-Haq) आणि अझर अली (Azhar Ali) यांनी पहिल्या डावात दीडशतकी खेळी केल्या. इमामने १५७ धावांची आणि अझर अलीने १८५ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅब्युशेन, नॅथन लायन आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
तसेच त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने देखील दमदार फलंदाजी केली. त्यांनी पहिल्या डावात सर्वबाद ४५९ धावा केल्या. पण त्यांना १७ धावांची पिछाडी स्विकारावी लागली. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने ९७, मार्नस लॅब्युशेन ९०, स्टीव्ह स्मिथ ७८ आणि डेव्हिड वॉर्नरने ६८ धावांच्या अर्धशतकी खेळी केल्या. तसेच कॅमेरॉन ग्रीनने ४८ धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून नौमान अलीने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या.
तसेच नंतर पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात इमाम आणि शफिकने शतकी खेळी केल्या. त्यामुळे पाचव्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात ७७ षटकात बिनबाद २५७ धावा झाल्या. त्यामुळे हा सामना अनिर्णित राहिला.
महत्त्वाच्या बातम्या –
VIDEO: वेदनेने विव्हळत असतानाही रिझवानने नाही सोडले मैदान; झुंजार वृत्तीचे केले जातेय कौतुक
जडेजाला पाचव्या क्रमांकावर बढती देण्यात आहे संघाचाच तोटा; माजी क्रिकेटरने सांगितले कारण
दोन वेगवेगळ्या ठिकाणी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यात घडली आश्चर्यकारक घटना; वाचा सविस्तर