---Advertisement---

केकेआरच्या भात्यातील ‘घातक अस्त्र’ अय्यरची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड होण्यामागची कहाणी

On: शुक्रवार, सप्टेंबर 24, 2021 11:06 AM
---Advertisement---

कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघ आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्याच्या तुलनेत दुसऱ्या टप्प्यात अप्रतिम प्रदर्शन करताना दिसत आहे. मुंबईविरुद्धच्या गुरुवारच्या (२३ सप्टेंबर) सामन्यात केकेआरने ७ विकेट्स राखून विजय मिळवला आहे. अशा रितीने दुसऱ्या टप्प्यातील केकेआरचा हा दुसरा विजय ठरला आहे. त्यांनी या प्रदर्शनाच्या जोरावर सर्वांना हैराण केले आहे. पहिल्या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला केकेआरकडून पराभव पत्करावा लागला आहे.  या दोन सामन्यांतील विजयानंतर केकेआर गुणतालिकेत पहिल्या ४ संघात पोहचला आहे.

या दोन सामन्यांमध्ये केकेआरचा सलामीवीर फलंदाज वेंकटेश अय्यरची भूमिका महत्वाची राहिली आहे. सामना संपल्यानंतर कर्णधार इयोन माॅर्गनने वेंकटेशने संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कशाप्रकारे संधी मिळवली? याचा खुलासा केला आहे.

वेंकटेशने आतापर्यंतच्या त्याच्या आयपीएल कारकिर्दीत केवळ २ सामने खेळले असून यामध्ये त्याने ९४ च्या सरासरीने ९४ धावा केल्या आहेत. त्याने त्याच्या आरसीबीविरुद्धच्या आयपीएलमधील पदार्पण सामन्यामध्ये २७ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या होत्या. तसेच मुंबईविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने ३० चेंडूत ५३ धावांची दमदार खेळी केली आहे.

कर्णधार इयोन मार्गनने सामना संपल्यावर याबाबत माहिती दिली आहे. तो म्हणाला, “जेव्हापासून ब्रेंडन मॅक्कलम संघासोबत जोडले गेले आहेत. तेव्हापासून त्यांची इच्छा होती की, आम्ही अशाच प्रकारे आक्रमक होऊन खेळावे. वेंकटेश अय्यरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देणे सोपे नव्हते. कारण संघात खूप प्रतिभाशाली खेळाडू उपस्थित आहेत. पण ज्याप्रकारे त्याने सराव सामन्यात धावा केल्या. त्यावरुन आम्ही त्याची निवड करण्यास भाग पडलो.”

“सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती दोन्ही आमचे मजबूत गोलंदाज आहेत. वेंकटेशने केकेआरच्या सराव सत्रात वरुण आणि सुनील यांनादेखील चांगलाच चोप दिला आहे. याच कारणास्तव त्याला संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली आहे,” असेही त्याने म्हटले.

वेंकटेशने मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, एडम मिल्ने आणि राहुल चाहर यांच्यासारख्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. त्याच्या फलंदाजीमध्ये एक विशेषता आहे ती म्हणजे, तो फलंदाजीच्या सुरुवातीपासून विरोधी गोलंदाजांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतो. अशात गोलंदाजाची लय बिगडते आणि त्याचाच वेंकटेश फायदा घेतो. आता वेंकटेश येत्या काही दिवसात आयपीएलमध्ये आणखी काय – काय पराक्रम करतो हे पाहावे लागेल.

महत्त्वाच्या बातम्या-

‘शांत’ कृष्णाचा ‘तापट’ पोलार्डशी पंगा, भर मैदानातील खडाजंगीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

मुंबईचा ‘कारभारी’ केकेआरविरुद्ध ठरला लय भारी! चौकारांचा ‘हा’ विक्रम करणारा बनला पहिलाच फलंदाज

डी कॉकचा ‘बुलेट’ चौकार थेट रोहितच्या डोक्यावरुन गेला अन् चाहत्यांच्या काळजात धस्स केलं, बघा तो प्रसंग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---