---Advertisement---

उद्यापासून सुरु होणाऱ्या आयपीएल २०१९ प्लेऑफबद्दल सर्वकाही…

On: सोमवार, मे 6, 2019 1:32 PM
---Advertisement---

रविवारी(5 मे) आयपीएल 2019 च्या साखळी फेरीतील शेवटचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स संघात पार पडला. या सामन्यात मुंबईने 9 विकेट्सने विजय मिळवला. मुंबईने या विजयाबरोबरच गुणतालिकेत पहिल्या स्थान पटकावले. त्याचबरोबर कोलकताचा पराभव झाल्याने सनरायझर्स हैद्राबादसाठी प्लेऑफचे दरवाजे उघडे झाले.

त्यामुळे आता आयपीएल प्लेऑफमध्ये खेळणारे चार संघ निश्चित झाले आहेत. प्लेऑफमध्ये चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स याआधीच स्थान निश्चित केले होते. मात्र चौथ्या जागेसाठी चूरस सुरु होती. पण अखेर कोलकताला मुंबई विरुद्ध साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात पराभव मिळल्याने हैद्राबाद प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ ठरला.

विशेष म्हणजे गुणतालिकेत पहिल्या तीनही स्थानावर असलेल्या संघाचे 18 गुण हे समान आहेत. त्यामुळे नेटरेनरेटनुसार त्यांची क्रमवारी लावण्यात आली आहे.

त्यामुळे आता पहिल्या स्थानावर असणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध दुसऱ्या स्थानवर असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघात प्लेऑफमधील क्वालिफायर 1 चा सामना रंगणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी ठरेल तो थेट अंतिम सामना खेळेल.

तसेच एलिमिनेटरचा सामना तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध साखळी फेरीत फक्त सहा सामने जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश केलेल्या हैद्राबाद संघाबरोबर होणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल त्याला क्वालिफायर 2 मध्ये क्वालिफायर 1 मधील पराभूत संघाशी सामना करावा लागेल. त्यानंतर क्वालिफायर 2 मधील विजेता संघ अंतिम सामना खेळेल.

7 मेपासून सुरु होणाऱ्या प्लेऑफचे सर्व सामने संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहेत.

असे असतील प्लेऑफचे सामने – 

7 मे – क्वालिफायर 1, चेन्नेई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई – संध्या. 7.30 वा.

8 मे – एलिमिनेटर, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद, डॉ. वायएसआर रेड्डी एसीए व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम – संध्या. 7.30 वा.

10 मे – क्वालिफायर 2, क्वालिफायर 1मधील पराभूत संघ विरुद्ध एलिमिनेटरमधील विजेता संघ,  डॉ. वायएसआर रेड्डी एसीए व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम – संध्या. 7.30 वा.

12 मे – अंतिम सामना, क्वालिफायर 1 मधील विजेता विरुद्ध क्वालिफायर 2 मधील विजेता, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हैद्राबाद – संध्या. 7.30 वा.

महत्त्वाच्या बातम्या –

दोन्ही सलामीवीरांनी एकाच वनडेत केल्या तब्बल १७० पेक्षा अधिक धावा, रचला विश्वविक्रम

फाफ डु प्लेसिसचे पहिले आयपीएल शतक हुकले केवळ ४ धावांनी, पहा व्हि़डिओ

एमएस धोनीनंतर आयपीएलमध्ये असा पराक्रम करणारा विराट कोहली दुसरा कर्णधार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment