कोलकाता। आज ईडन गार्डन स्टेडियमवर पार पडलेल्या आयपीएल २०१८च्या क्वालिफायर २ सामन्यात सनरायझर्स हैदराबादने कोलकातावर १४ धावांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे.
आज हैद्राबादकडून रशीद खानने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करताना हैद्राबादच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. त्याने आज फलंदाजी करताना १० चेंडूत नाबाद ३४ धावा केल्या. तर गोलंदाजी करताना १९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.
आज हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १७४ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाताकडून ख्रिस लिन आणि शुभमन गिलने चांगली लढत दिली होती परंतु बाकी फलंदाजांनी योग्य साथ न दिल्याने कोलकाताला २० षटकात ९ बाद १६० धावच करता आल्या.
आता हैद्राबादचा सामना २७ मेला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध होणार आहे. हा अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
–इतिहास घडणार, भारतीय खेळाडू देशाबाहेरील या लीगमध्ये खेळणार!
–आयपीएलमधील ४ खऱ्या आॅलराउंडरची नावे वाचून तुम्हाला धक्काच बसेल
–टाॅप ५- एकही शतक न करता या दिग्गजांनी केल्या आयपीएलमध्ये ४ हजार धावा
–शिखर धवनने हा विक्रम करत धोनीला टाकले मागे