मुंबई। आज(3 एप्रिल) आयपीएल 2019 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज संघात वानखेडे स्टेडियमवर सामना रंगणार आहे. या सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी, सुरेश रैना आणि ड्वेन ब्रावोला खास विक्रम करण्याची संधी आहे.
धोनीने या सामन्यात 2 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो चेन्नई सुपर किंग्स संघासाठी 4000 धावांचा टप्पा पार करेल. तसेच हा टप्पा पार करणारा सुरेश रैना नंतरचा दुसराच खेळाडू ठरेल. धोनीने आत्तापर्यंत चेन्नई सुपर किंग्सकडून 172 सामने खेळताना 3998 धावा केल्या आहेत. तर रैनाने 174 सामन्यात 5071 धावा केल्या.
त्याचबरोबर सुरेश रैनाने जर आज 2 किंवा त्यापेक्षा अधिक झेल घेतले तर तो आयपीएलमध्ये 100 झेल पूर्ण करेल. तसेच असा पराक्रम करणारा पहिला आणि एकमेव खेळाडू ठरेल. त्याने आयपीएल कारकिर्दीत 179 सामन्यात आत्तापर्यंत 98 झेल घेतले आहे.
या दोघांबरोबरच ड्वेन ब्रावोला चेन्नईकडून 100 विकेट्स पूर्ण करण्यासाठी केवळ एका विकेटची गरज आहे. जर त्याने हा पराक्रम केला तर तो चेन्नईकडून 100 विकेट्स घेणारा पहिलाच गोलंदाज ठरेल. सध्या त्याने चेन्नईकडून 80 सामन्यात गोलंदाजी करताना 21.61 च्या सरासरीने 99 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
–२००७ विश्वचषकात खेळलेले हे ५ खेळाडू खेळणार २०१९ विश्वचकातही
–कर्णधार अजिंक्य रहाणेला स्टिव्ह स्मिथचा खास सल्ला, पहा व्हिडिओ
–आयपीएल २०१९: चेन्नई विरुद्धच्या सामन्याआधी मुंबई इंडियन्ससाठी ही आहे निराशाजनक बातमी…





